राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा ; महाराष्ट्रातील 4 खेळाडूंना स्थान, स्वप्निल कुसळेला अर्जुन पुरस्कार जाहीर

Sports National Awards 2024 : यंदा खेळरत्न पुरस्कार 4 खेळाडूंना मिळाला असून अर्जुन अवॉर्ड यंदा 32 खेळाडूंना जाहीर करण्यात आलेला आहे. 

पुजा पवार | Updated: Jan 2, 2025, 08:23 PM IST
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा ; महाराष्ट्रातील 4 खेळाडूंना स्थान, स्वप्निल कुसळेला अर्जुन पुरस्कार जाहीर title=
(Photo Credit : Social Media)

National Sports Award 2024 Winner List: भारत सरकारकडून राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा गुरुवार 2 जानेवारी रोजी करण्यात आलेली आहे. यात 2024 मध्ये खेळरत्न, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार इत्यादींनी गौरवण्यात येणाऱ्या खेळाडूंची नावं समोर आली आहेत. यंदा खेळरत्न पुरस्कार 4 खेळाडूंना मिळाला असून अर्जुन अवॉर्ड यंदा 32 खेळाडूंना जाहीर करण्यात आलेला आहे. यात महाराष्ट्राचा स्वप्नील कुसळे, मुरलीकांत पेटकर, सचिन खिलारी यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्वप्नील कुसळे (Swapnil Kusale) आणि स्वप्नील कुसळे यांना 2024 मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाजीत भारताला कांस्य पदक जिंकवून दिले होते. तर स्वप्नील सह त्याची प्रशिक्षक दिपाली देशपांडे (Deepali Deshpande) हिला देखील द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 

डी गुकेश सहित चौघांना खेळ रत्न पुरस्कार : 

खेळ रत्न हा भारत सरकारकडून जाहीर करण्यात येणाऱ्या क्रीडा क्षेत्रातील सर्वोश्रेष्ठ अवॉर्ड पैकी एक आहे. यंदा भारत सरकारकडून दिला जाणारा खेळरत्न अवॉर्ड नक्की कोणाला मिळणार याची उत्सुकतात होती. यंदा खेळरत्न हा 4 खेळाडूंना देण्यात आलेला असून यात मनु भाकर (शूटिंग), डी गुकेश (बुद्धीबळ). हरमनप्रीत सिंह (हॉकी), प्रविण कुमार (पॅरा ऑलम्पिक गोल्ड मेडलीस्ट) यांना जाहीर करण्यात आलेला आहे. 

महाराष्ट्रातील चौघांचा सन्मान : 

राष्ट्रीय खेळ पुरस्कारांच्या यादीत महाराष्ट्राच्या चार खेळाडूंना पुरस्कार घोषित करण्यात आलेले आहेत. यात यंदा पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला शूटिंगमध्ये कांस्यपदक जिंकवून देणाऱ्या स्वप्निल कुसळे याला  भारत सरकारकडून अर्जुन पुरस्कार देण्यात येणार आहे. स्वप्निल कुसळे हा मूळ कोल्हापूरचा असून तो रेल्वे कर्मचारी देखील आहे. स्वप्निल कुसळेच्या रूपाने महाराष्ट्राला खाशाबा जाधवांनंतर दुसरं ऑलिम्पिक पदक मिळालं होतं. तर स्वप्निल कुसळे याला नेमबाजीचं प्रशिक्षण देणाऱ्या दिपाली देशपांडे यांना देखील द्रोणाचार्य पुरस्कार देण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील सचिन सर्जेराव खिलारी याने देखील पॅरालिम्पिक 2024 मध्ये गोळा फेकीत कांस्य पदक जिंकलं होतं. 40 वर्षानंतर शॉटपुटमध्ये पदक जिंकणारा तो पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला होता. तेव्हा या उल्लेखनीय कामगिरीसाठी सचिन खिलारी याला देखील अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच पॅरा जलतरणपटू मुरलीकांत पेटकर यांना देखील सन्मानित करण्यात अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.