ना विराट ना रोहित 'या' खेळाडूशिवाय टीम इंडिया अपूर्णच- कपिल देव

 कपिल देव यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले हा खेळाडू नसला तर टीम अपूर्णच  

Updated: Oct 25, 2022, 10:45 PM IST
ना विराट ना रोहित 'या' खेळाडूशिवाय टीम इंडिया अपूर्णच- कपिल देव title=

Kapil Dev on indian Team : भारताला पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या संघाचे कर्णधार माजी खेळाडू कपिल देव प्रत्येकालाच माहित आहेत. अशातच कपिल देव यांनी मिशन टी-20 वर्ल्ड कपवर असलेल्या टीम इंडियातील एका खेळाडूचं मन भरून कौतुक केलं आहे. टीम इंडियामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि दिनेश कार्तिक यांच्यासारखे मॅचविनर खेळाडूंचं नाहीतर एका युवा धडाकेबाज खेळाडूचं कौतुक केलं आहे. (T-20 World Cup 2022 Kapil Dev on Suryakumar yadav latest marathi sport News)

भविष्यात सूर्यकुमार यादव हा भारतीय संघाचा इतका महत्त्वाचा खेळाडू ठरेल, असं कोणालाच वाटलं नव्हतं. मात्र त्याने आपल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर स्थान मिळवलं असून संपूर्ण जग त्याचं कौतुक करत आहेत. आता त्याच्याशिवाय भारतीय संघाचा विचारही करता येणार नसल्याचं कपिल देव यांनी म्हटलं आहे. 

संघात आधीच केएल राहुल, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा समावेश असून आता सूर्यकुमार यादवच्या आगमनाने संघाला अधिक बळ मिळाले आहे. मला आशा आहे की तो अशीच कामगिरी करत राहिल, असंही कपिल देव म्हणाले. पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यामध्ये सूर्याने दोन चौकार ठोकत चांगली सुरूवात केली होती. मात्र त्याला मोठी खेळी करता आली नाही आता पुढच्या सामन्यामध्ये त्याच्याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

सूर्यकुमार यादवने आतापर्यंत टी-20 फॉरमॅटमध्ये भारतासाठी 35 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 37.86 च्या सरासरीने आणि 176.37 च्या स्ट्राइक रेटने 1060 धावा केल्या आहेत. सूर्या सध्या ICC T-20 फलंदाजी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. या क्रमवारीत पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान पहिल्या स्थानावर आहे.