India Women Hockey olympics :घोडागाडी चालवून वडिलांनी तिला केलं हॉकिची 'राणी', संघर्ष इथंही चुकला नाही

 मुलीनं असे कपडे घालण्यासंदर्भात सुरुवातीला त्यांनीही नकारात्मक सूर आळवला होता. 

Updated: Aug 4, 2021, 04:14 PM IST
India Women Hockey olympics :घोडागाडी चालवून वडिलांनी तिला केलं हॉकिची 'राणी', संघर्ष इथंही चुकला नाही
छाया सौजन्य- सोशल मीडिया

India vs Argentina Women Hockey Semifinals: भारतीय महिला हॉकी संघाची कामगिरी क्रीडा वर्तुळात प्रत्येकाचंच लक्ष वेधत आहे. अशा या संघातील प्रत्येक खेळाडूनं दमदार कामगिरी करत संघाला अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत आणलं ज्यामुळं खेळाडूंवर कौतुकाचा अविरत वर्षाव होताना दिसत आहे. याच संघातील राणी रामपाल (rani rampal) या खेळाडूची संघर्षगाथा सध्या अनेकांच्या नजरा वळवत आहे. 

ज्युनियर विश्वचषकात कांस्य पदकाची कमाई करणाऱ्या संघातही राणी सहभागी होती. सातव्या स्थानावर असणाऱ्या (indian hockey ) भारतीय हॉकी संघात फॉरवर्ड फिल्डर म्हणून राणी महत्त्वाच्या भूमिकेत असते. संघाचं कर्णधारपद भूषवण्यासोबतच राणी ही फॉरवर्ड खेळाडू म्हणून विरोधी संघापुढे मोठं आव्हान निर्माण करते. 

मारकंडा येथे एका टांगेवाल्याच्या कुटुंबात राणीचा जन्म झाला. राष्ट्रीय खेळ असणाऱ्या (hockey) हॉकीमध्ये तिनं करिअर घडवण्याचा निर्धार केला आणि नावाप्रमाणंतच ती राणी ठरली. हॉकी खेळणं म्हणजे एक गुन्हा होतं. वडील घोडागाडी चालवत असल्यामुळं दिवसागणिक शंभर रुपयेही हातात येणं कठीण होतं. पाऊस पडू नये यासाठी राणीचं कुटुंब प्रार्थना करत होतं. कारण, घरात पावसाचं पाणी साठायचं. परिस्थिती तशी हलाखीची. पण, वयाच्या 6 व्या वर्षापासून राणीला हॉकीचं वेड लागलं ते आजतागायत कायम आहे. 

हॉकी अकादमीमध्ये प्रवेश मिळवणंही राणीसाठी सोपं नव्हतं. पण, तिच्या जिद्दीपुढे परिस्थितीनंही शरणागती पत्करली. ट्रेनिंग सुरु झाली, त्यावेळी परिस्थितीअभावी राणीला डाएटही व्यवस्थित पद्धतीनं फॉलो करता आला नव्हता. प्रशिक्षक तिला अर्धा लीटर दूध आणण्यासाठी सांगत पण, ही मात्र त्यापेक्षा कमीच दूध नेत आणि त्यात पाणी मिसळून घेत. परिस्थिती अशी होती की कुटुंबाला फक्त दर दिवशी 200 मिली दुधाचीच व्यवस्था करणं शक्य होतं. अशाच प्रशिक्षणात व्य़त्यय नको यासाठी ही 'पाणीबाणी'. 

olympic 2020 : वडिलांचं अपुरं स्वप्न पूर्ण करु पाहणाऱ्या कुस्तीपटू दीपक पुनियाचा स्वप्नभंग; सेमीफायनलमध्ये पराभव 

 

पुढे परीक्षा होती ती म्हणजे तोकडे कपडे घालण्यासाठी परवानगी मिळवण्याची. कसंबसं राणीनं आईवडिलांना यासाठी तयार केलं होतं. मुलीनं असे कपडे घालण्यासंदर्भात सुरुवातीला त्यांनीही नकारात्मक सूर आळवला होता. पण, राणी या अनोख्या विश्वात आली आणि तिनं मागे वळून पाहिलं नाही. अवघ्या 15 व्या वर्षी ती भारतीय महिला हॉकी संघात सहभागी झाली. 2009 मध्ये टॉप गोल स्कोरर आणि यंगेस्ट प्लेअर म्हणून तिला गौरवण्यात आलं. 2019 मध्ये वर्ल्ड गेम्स एथलीट ऑफ द इयर  म्हणून तिचा गौरव झाला.