AUS vs AFG: कर्णधाराची एक चूक आणि...; हश्मतुल्लाहच्या मूर्खपणामुळे अफगाणिस्तानवर पराभवाची नामुष्की

AUS vs AFG: वानखेडे मैदानावर अफगाणिस्तानच्या टीमने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी अफगाणिस्तानच्या टीमने 5 विकेट्स गमावून 291 रन्सची खेळी करत कांगारूंना 292 रन्सचं टारगेट दिलं. 

सुरभि जगदीश | Updated: Nov 8, 2023, 08:33 AM IST
AUS vs AFG: कर्णधाराची एक चूक आणि...; हश्मतुल्लाहच्या मूर्खपणामुळे अफगाणिस्तानवर पराभवाची नामुष्की title=

AUS vs AFG: वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलिया विरूद्ध अफगाणिस्तान यांच्यात सामना रंगला होता. रोमांचक झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या टीमने 3 विकेट्सने अफगाणिस्तानचा पराभव केला. यावेळी मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या या सामन्याचा आनंद अनेक चाहत्यांनी लुटला. या विजयाचा खरा शिल्पकार ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ग्लेन मॅक्सवेल ठरला. अफगाणिस्तान कर्णधार हश्मतुल्लाह शहीदीच्या एका चुकीमुळे टीमवर पराभवाची नामुष्की ओढावल्याचं म्हटलं जातंय.   

वानखेडे मैदानावर अफगाणिस्तानच्या टीमने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी अफगाणिस्तानच्या टीमने 5 विकेट्स गमावून 291 रन्सची खेळी करत कांगारूंना 292 रन्सचं टारगेट दिलं. या सामन्यात एक वेळ अशी आली होती की, ऑस्ट्रेलियाची टीम हा सामना गमावणार असं दिसून येत होतं. मात्र मॅक्सवेलची जादू चालली आणि अफगाणिस्तानचा विजयाच्या आशांवर पाणी फेरलं. 

मंगळवारी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 292 रन्सचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरूवात खराब झाली. ट्रॅव्हिस हेड दुसऱ्याच ओव्हरमध्ये बाद झाला अन् कांगारूंची पडझड सुरू झाली. डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांनाही मोठी खेळी साकारता आली नाही. यानंतरही अफगाणिस्तानने ठराविक टप्प्यात विकेट घेत ऑस्ट्रलियाला 91 वर 7 विकेट्स अशा परिस्थितीत आणलं. मात्र, ऑस्ट्रेलियाला ग्लेन मॅक्सवेल कडवी टक्कर दिली.

वानखेडेच्या मैदानावर ग्लेन मॅक्सवेल नावाचं तुफान

ग्लेन मॅक्सवेलने एकट्याने ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. या सामन्यात 292 रन्सचं टारगेट असताना त्याने 201 रन्सची शानदार खेळी केली. एकेकाळी ऑस्ट्रेलियाचा पराभव निश्चित मानला जात होता पण मॅक्सवेलने आपल्या तुफान खेळीच्या जोरावर विजयापर्यंत नेलं अन् ऑस्ट्रेलियाला सेमीफायनलमध्ये पोहोचवलं आहे. मॅक्सवेलने या सामन्यात 128 बॉलमध्ये 201 धावांची वादळी खेळी केली. यामध्ये 21 फोर आणि 10 सिक्सेसचा समावेश आहे.

हश्मतुल्लाहच्या मूर्खपणामुळे अफगाणिस्तानचा पराभव

हशमतुल्ला शाहिदीने या सामन्यात बरीच निराशा केली. प्रथम फलंदाजी करताना त्याने धीम्या गतीने फलंदाजी करत 43 बॉल्समध्ये केवळ 26 रन्स केले. तर फिल्डींगमध्येही त्याने खेळाडूंना साथ द्यायला हवी होती. मात्र यावेळी त्याने काही ठिकाणी मिस फिल्डींग केली. याशिवाय ग्लेन मॅक्सवेल 33 रन्सवर खेळत असताना मुजीबने त्याचा कॅच सोडला. याचा परिणाम अफगाणिस्तानला पराभवाच्या रूपाने भोगावा लागला.