पाकिस्तानच्या या फलंदाजाचा पराक्रम, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी

पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया (pak vs aus 2nd test) यांच्यात कराचीत दुसरा कसोटी सामना पार पडला. या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे.  

Updated: Mar 16, 2022, 09:54 PM IST
पाकिस्तानच्या या फलंदाजाचा पराक्रम, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी  title=
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई :  भारताबरोबरच पाकिस्तानमध्येही क्रिकेट मोठ्या प्रमाणात पाहिलं जातं. टीम इंडियाचा (Team India) कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) या दोघांनी जगभरात धावा केल्या आहेत.  मात्र आता एका पाकिस्तानी फलंदाजाने क्रिकेट जगतावर दबदबा निर्माण केला आहे. त्याने नवा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. (pak vs aus 2nd test day 5 pakistan captain babar azam scored 196 runs hihest runs by 4th innings at national stadium karachi)  

पाकच्या खेळाडूचा वर्ल्ड रेकॉर्ड 

पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया (pak vs aus 2nd test) यांच्यात कराचीत दुसरा कसोटी सामना पार पडला. या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे. बाबरने या खेळीदरम्यान अनेक विक्रम आपल्या नावावर केले. मात्र दुर्देवाने आझमचं 4 धावांनी द्विशतक हुकलं. बाबर 196 धावांवर आऊट झाला. 

बाबरने 425 चेंडूत 196 धावांची कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी केली. या खेळीत बाबरने 21 चौकार आणि 1 खणखणीत सिक्स ठोकला. बाबर हा जगातील पहिला कर्णधार आहे ज्याने कसोटीच्या चौथ्या डावात 190 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना आतापर्यंत ही कामगिरी करता आलेली नाही.
 
मैदानात घालवला सर्वाधिक वेळ 

बाबर आझम पाकिस्तानसाठी चौथ्या डावात मैदानात सर्वाधिक वेळ खेळणारा फलंदाज ठरला. बाबरला नॅथन लियॉनने मार्नस लॅबुशेनच्या हाती कॅच आऊट केलं. बाबर तब्बल 607 मिनिटं क्रीजवर राहिला. बाबरच्या या झुंझार खेळीमुळे पाकिस्तानला सामना ड्रॉ करता आला. 
 
पाकिस्तानकडून बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी शानदार शतके झळकावली.  या दोघांच्या शतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानला सामना अनिर्णित राखण्यात यश आलं. रिझवानेने 104 धावांची खेळी खेळली. 

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 556 धावा केल्या, याला प्रत्युत्तर देताना पाकिस्तानचा संघ 148 धावांवर ऑल-आऊट झाला. त्याचवेळी, सामन्याच्या शेवटच्या दिवशी, पाकिस्तानला विजयासाठी मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. तर ऑस्ट्रेलियाला 7 विकेट्सची गरज होती, मात्र अखेरीस सामना अनिर्णित राहिला.