'बुमराह माझ्याकडून शिकला, रोहितला माझ्यासमोर चाचपडतो'; 'पाकिस्तानी' क्रिकेटरचा दावा

Pakistan Born Pacer Claims About Rohit Sharma Bumrah: रोहित शर्मा हा फलंदाजीमध्ये तर जसप्रीत बुमराह हा गोलंदाजीमध्ये जगातील अव्वल खेळाडू असतानाच आता हा दावा एका पाकिस्तानमध्ये जन्मलेल्या खेळाडू केला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 18, 2024, 12:18 PM IST
'बुमराह माझ्याकडून शिकला, रोहितला माझ्यासमोर चाचपडतो'; 'पाकिस्तानी' क्रिकेटरचा दावा title=
रोहित, बुमराहबद्दल दावा

Pakistan Born Pacer Claims About Rohit Sharma Bumrah: इंडियन प्रिमिअर लीगच्या माध्यमातून भारतीय संघांबरोबरच अनेक परदेशी संघांनाही एकाहून एक सरस खेळाडू सापडलेत असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. भारतीय संघाला गवसलेल्या स्टार खेळाडूंमध्ये जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, सुर्यकुमार यादव, इशान किशन यासारख्या खेळाडूंची नाव घेता येईल. मिळालेल्या संधीचं सोनं करत पुढे आलेले हे खेळाडू आज भारतीय संघाचा आधारस्तंभ आहेत. एकीकडे हे असे खेळाडू असतात आणि दुसरीकडे प्रचंड क्षमता असूनही पुरेसी संधी न मिळालेले खेळाडू असतात. असाच एका खेळाडू म्हणजे पाकिस्तानमध्ये जन्मलेला मात्र मायदेशी संधी न मिळाल्याने संयुक्त अरब अमिरीच्या राष्ट्रीय संघातून खेळून आपलं क्रिकेटपटू होण्याचं स्वप्न पूर्ण करणारा जलदगती गोलंदाज झाहूर खान!

कोण आहे हा खेळाडू?

2014 साली झाहूर खान हा मुंबई इंडियन्सच्या संघाशी जोडला गेला तो नेट गोलंदाज म्हणून. त्याने यावेळेस अनेक नावाजलेल्या खेळाडूंबरोबर नेट्समध्ये सराव केला. 2020 मध्ये कोरोनामुळे आयपीएल युएईला खेळवण्यात आलं त्यावेली नेटमध्ये झाहूरची कामगिरी पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. त्याने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. अगदी इतरांना आश्चर्याचा धक्का देणारा बुमराही त्याची गोलंदाजी पाहून थक्क झाला होता. झाहूरने दिलेल्या माहितीनुसार, त्याला स्लो बॉलिंगने बुमराह एवढा इम्प्रेस झाला की त्याने संथ गोलंदाजीचे धडे या युएईच्या गोलंदाजाकडून घेतले. खास करुन मंद गतीने गोलंदाजी करताना चेंडू कसा धरावा याचे धडे बुमराहने झाहूरकडून घेतल्याचं तो सांगतो.

बुमराह माझ्याकडून स्लो गोलंदाजी शिकला

"मी तीन महिने मुंबई इंडियन्सबरोबर होतो. मी त्यावेळेस रोहित शर्माबरोबर बराच वेळ सराव केला. हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराहबरोबरची सरावाची संधी मिळाली. बुमराहला माझी गोलंदाजी एवढी आवडली की त्याने मला बॉल कसा पकडावा हे सुद्धा विचारुन घेतलं. हा स्लो बॉल कसा टाकतोस तू? असं त्याने मला विचारलं होतं. ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट होती कारण तो जगातील पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज असून तो मला बॉलिंग कशी करायची हे विचारत होता. त्याने टी-10 स्पर्धेमध्ये मी निर्धाव षटकं टाकल्याचे अनेक व्हिडीओही बघितल्याचं मला सांगितलं. मी त्याला स्लो गोलंदाजीबद्दल सांगितलं. मात्र त्याचवेळी त्याच्याकडून नव्या चेंडूने यॉर्कर टाकण्याचं तंत्र शिकून घेतलं. कारण जगातील केवळ दोघांनाच नव्या बॉलने यॉर्कर टाकतात येतात. हे दोघे म्हणजे लसिथ मलिंगा आणि जसप्रीत बुमराह," असं झाहूर 'स्पोर्ट्स तक'शी बोलता म्हणाला.

नक्की वाचा >> आयुष्य पणाला लागलं असेल तर कोणाला बॅटींगला पाठवशील? युवराजने धोनी, विराटऐवजी घेतलं 'हे' नाव

रोहितला माझी गोलंदाजी खेळता यायची नाही

रोहितबरोबराचा अनुभव सांगताना झाहूरने पहिल्या भेटीतच रोहितने मला आपलसं करुन घेताना, "संपूर्ण स्टेडियम तुमचं आहे पाजी, काहीही लागलं तर बिनधास्त सांगा," असं म्हटल्याचं सांगितलं. आजही रोहितचं माझ्यावरील प्रेम तसेच असल्याचं झाहूर म्हणाला. "मी रोहित शर्मालाही गोलंदाजी केली आहे. मी एकदा स्लो चेंडूवर त्याला बोल्ड केलं होतं. तो त्यानंतर बघतच राहिला होता कारण तो बॉल त्याच्यापर्यंत पोहचलाच नाही असं त्याला वाटत होतं. त्याला माझे चेंडू समजतच नसायचे. तू एवढ्या स्लो चेंडू कसा टाकतो? असं तो विचारायचा. तो मला म्हणायचा गोलंदाजाचा तुझा चेंडू समजला तरी त्याला त्यावर कधीच षटकार मारता येणार नाही," असं झाहूरने सांगितलं.

पुन्हा मुंबईबरोबर खेळायला आवडेल

झाहूर नुकताच ग्लोबल टी-20 कॅनडा स्पर्धेत खेळला आहे. झाहूरने पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सबरोबर काम करायला आवडेल असं म्हटलं आहे.