लाहोर : पाकिस्तान सुपर लीग सीझन ३ चा दुसरा एलिमिनेटर सामना कराची किंग्ज आणि पेशावर जालमी यांच्यात खेळविण्यात आला पण या मॅचपूर्वी पावसाला सुरूवात झाली त्यामुळे मैदान खूप ओले झाले होते. ते सुखविण्याचे सर्व प्रयत्न करण्यात आले. अखेरीस मैदान सुखविण्यासाठी दोन हेलिकॉप्टर मागविण्यात आले. यात पाकिस्तान आर्मीचे एका हेलिकॉप्टरचा समावेश होता. या हेलिकॉप्टरने मैदानावर सलग १५-२० मिनिटे उड्डाण केले आणि मैदान सुकवण्याचा प्रयत्न केला.
गद्दाफी स्टेडियममध्ये असे दुसऱ्यांदा झाले आहे की पिच सुकवण्यासाठी हेलिकॉप्टर बोलविण्यात आले आहे. या पूर्वी वर्ल्ड कप दरम्यान १९९६ मध्ये श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाचा सामन्यात असे करण्यात आले होते. या सीझनचे केवळ ३ सामने पाकिस्तानात खेळण्यात येणार आहे. राऊंड रॉबिन मॅचेस दुबईत खेळविण्यात आले. मंगळवारी पेशावर जालमी आणि क्वेटा ग्लॅडिएटर्स दरम्यान खेळविण्यात आलेल्या सामन्यातही पावसाचा व्यत्यय आला होता.
Helicopter here at the Gaddafi Stadium to make the field dry. #HBLPSL pic.twitter.com/JUibYzrIyx
— Mazher Arshad (@MazherArshad) March 21, 2018
Helicopter arrives at the Gaddafi Stadium to help dry the wet outfield
#DilSeJaanLagaDe #HBLPSL#KKvPZ pic.twitter.com/ohbSxsvkHA— PakistanSuperLeague (@thePSLt20) March 21, 2018
पाहा दोन्ही संघ
कराची किंग्स: इमाद वासीम (कप्तान), शाहिद अफरीदी, उस्मान खान, उसामा मीर, खुर्रम मंजूर, रवि बोपारा, बाबर आजम, मोहम्मद आमिर, मोहम्मद रिजवान, कॉलिन इंग्राम, मिशेल जॉनसन, ल्यूक राइट, डेविड वाइ, ताबिश खान, मोहम्मद इरफान जूनियर, हसन मोहसिन, कॉलिन मुनरो, इयोन मॉर्गन, सैफुल्ला बंगाश
Second helicopter makes its way to GSL to help dry the wet outfield. #DilSeJaanLagaDe #KKVPZ pic.twitter.com/UZh6RgC9x0
— PakistanSuperLeague (@thePSLt20) March 21, 2018
पेशावर जालमी: डैरेन सैमी (कप्तान), मोहम्मद हफीज, वहाब रियाज, शाकिब अल हसन, कामरान अकमल, हसन अली, हरीस सोहेल, क्रिस जॉर्डन, मोहम्मद असगर, ड्वेन ब्रावो, तामिम इकबाल, हम्माद आजम, साद नसीम, तैमूर सुल्तान, समीन गुल, इबटिसम शेख, आंद्रे फ्लेचर, इविन लुईस, खालिद उस्मान, मोहम्मद आरिफ