एबी डिविलियर्सनं टीपले 'विरुष्का'चे रोमँटीक क्षण

एका क्लिकवर पाहा त्यांचा हा सुपर रोमँटीक फोटो   

Updated: Oct 19, 2020, 08:04 AM IST
एबी डिविलियर्सनं टीपले 'विरुष्का'चे रोमँटीक क्षण
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : क्रिकेटर विराट कोहली आणि त्याची पत्नी, अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या त्यांच्या आयुष्यातील अत्यंत सुरेख अशा वळणावर आहेत. पालकत्त्वाचा स्वीकार करण्यासाठी सज्ज असणारी ही जोडी त्यांच्या बाळाच्या आगमनाची प्रतीक्षा करत आहे. अशातच त्यांचं हे नातं अनेकांना कपल गोल्स देऊन जात आहे. मुख्य म्हणजे विराटनं सोशल मीडियावर पोस्ट केलेला एक फोटो पाहता पुन्हा एकदा ही जोडी नेमकी मोस्ट हॅपनिंग सेलिब्रिटी कपल्सच्या यादीत अग्रस्थानी का येते हेच स्षष्ट होत आहे. 

सध्या विराट दुबईमध्ये IPL 2020 आयपीएल 2020 स्पर्धेसाठी गेला आहे. पत्नी अनुष्का हिचीही त्याला साथ मिळत आहे. अशातच आपल्या पत्नीसोबत तो काही खास क्षणही व्यतीत करताना दिसत आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्यातील याच काही खास आणि तितक्याच रोमँटीक क्षण क्रिकेटपटू एबी डिविलियर्स यानं त्याच्या कॅमेऱ्यात कैद केले आहेत. या निमित्तानं विरुष्कासाठी एक अनोखी आठवणही या फोटोच्या रुपात तयार झाली, असं म्हणायला हरकत नाही. 

सूर्यास्ताच्या वेळी सूर्यकिरणांच्या लाल छटांची होणारी उधळण, समुद्राच्या लाटा अंगावर घेणारे विराट- अनुष्का आणि पार्श्वभूमीत असणारी वास्तू असा सुरेख मेळ या फोटोमध्ये साधला गेल्याचं पाहायला मिळत आहे. फार काही कॅप्शन न देता विराटनं हार्ट आणि सुर्यास्त दाखवणारे इमोजी वापरत हा फोटो टीपण्याचं सौजन्य डिविलियर्सला दिलं आहे. 

 
 
 
 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on

 

 

सोशल मीडियावर त्यानं हा फोटो पोस्ट करताच चाहत्यांनीही त्याला कमालीची पसंती दिली असून, त्यांचा हा सुपर रोमँटीक फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्याचं पाहायला