प्रो कबड्डी, पिंपरी-चिंचवडच्या विराजची दिल्ली संघात निवड

पिंपरी चिंचवडचा कबड्डीपटू विराज लांडगे याची प्रो कबड्डीच्या पाचव्या हंगामात दबंग दिल्ली संघासाठी निवड झाली आहे. पिंपरी चिंचवडमधून प्रो-कबड्डीसाठी निवड झालेला विराज लांडगे एकमेव खेळाडू आहे. 

Updated: May 27, 2017, 07:07 PM IST
प्रो कबड्डी, पिंपरी-चिंचवडच्या विराजची दिल्ली संघात निवड

पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवडचा कबड्डीपटू विराज लांडगे याची प्रो कबड्डीच्या पाचव्या हंगामात दबंग दिल्ली संघासाठी निवड झाली आहे. पिंपरी चिंचवडमधून प्रो-कबड्डीसाठी निवड झालेला विराज लांडगे एकमेव खेळाडू आहे. 

प्रो-कबड्डीच्या यंदाच्या पाचव्या हंगामात आठ ऐवजी एकंदर १२ संघ असणार आहेत. यात दबंग दिल्ली संघात पिंपरी चिंचवडमधल्या भोसरीतल्या भैरवनाथ कबड्डी संघांचा खेळाडू विराज लांडगे याची निवड झाली आहे. आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू असलेला विराज लांडगे गेल्या दहा वर्षांपासून विविध स्पर्धा गाजवतोय. 

विराजचे वडील विष्णू लांडगे पिंपरी चिंचवड महापालिकेत शिपाई पदावर नोकरीला आहेत. तर आई शोभा लांडगे कापड दुकान चालवतात. आपल्या मुलाच्या कामगिरीचा त्यांना अभिमान आहे. डाव्या बाजूने खेळणाऱ्या विराजच्या आगामी कामगिरीकडे आता सर्व पिंपरी चिंचवडकरांचं लक्ष लागलं आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x