PT Usha IOA President: उडानपरी आणि गोल्डन गर्ल (Golden Girl) अशी उपाधी लाभलेल्या, भारताची माजी ऑलिंपिक खेळाडू आणि महान धावपटू पी. टी. उषा यांनी (PT Usha) नवा इतिहास रचला आहे. भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या (Indian Olympic Association) कारकिर्तीतील नवा विक्रम पीटी उषा यांनी नावावर केला आहे. भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्षा (First woman president of the Indian Olympic Association) होण्याचा मान पीटी उषा यांनी मिळवला आहे.
पीटी उषा यांनी आयओएच्या (IOA) सर्वोच्च पदासाठी उमेदवारी दाखल केली आहे. पीटी उषा यांच्यासह आणखी 14 जणांनी विविध पदांसाठी नामांकन दाखल केलंय. नामांकन दाखल करण्यासाठी रविवारपर्यंत मुदत होती. त्यानंतर आता पीटी उषा यांची भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी (IOA President) निवड झाली आहे.
पीटी उषाने 2000 साली क्रीडा जगताला रामराम ठोकला होता. त्यांनी 1982 ते 1994 या कालावधीत आशियाई क्रीडा स्पर्धेत चार सुवर्णांसह 11 पदके जिंकली. याशिवाय, पीटी उषाने 1986 सोल आशियाई क्रीडा स्पर्धेत 100 मीटर शर्यतीत रौप्य पदकासह चारही सुवर्ण (200 मीटर, 400 मीटर, 400 मीटर अडथळा आणि 4x400 मीटर रिले) पदके जिंकली होती.
आणखी वाचा - Team India: टीम इंडियाचा नवा कॅप्टन कोण? गौतमच्या वक्तव्याने वातावरण 'गंभीर'!
दरम्यान, भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी (President of the Indian Olympic Association) निवड झाल्याबद्दल केंद्रीय कायदेमंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी पीटी उषा यांचं अभिनंदन केलंय. कायदामंत्र्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय की, 'भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल दिग्गज गोल्डन गर्ल पीटी उषा यांचे अभिनंदन, मी प्रतिष्ठित आयओए, भारताचे पदाधिकारी बनल्याबद्दल देशातील सर्व क्रीडा खेळाडूंचे अभिनंदन करतो. मला तुझा अभिमान आहे.', असंही त्यांनी म्हटलंय.