Team India: टीम इंडियाचा नवा कॅप्टन कोण? गौतमच्या वक्तव्याने वातावरण 'गंभीर'!

Gautam Gambhir: गौतम गंभीरने टीम इंडियाच्या (Indian Cricket Team) अशा दोन खेळाडूंची नावं सांगितली आहेत जे भविष्यात संघाचे नेतृत्व करताना दिसू शकतात.

Updated: Nov 28, 2022, 05:24 PM IST
Team India: टीम इंडियाचा नवा कॅप्टन कोण? गौतमच्या वक्तव्याने वातावरण 'गंभीर'! title=
Gautam Gambhir,hardik pandya ,prithvi shaw

Gautam Gambhir On Team India Next Captain: टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधील पराभवानंतर टीम इंडियाच्या (Team India) कॅप्टनसीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहेत. कॅप्टन रोहित शर्माचं (Rohit Sharma) कर्णधारपद आता धोक्यात आल्याचं दिसतंय. त्यामुळे टीम इंडियाचा पुढचा कॅप्टन (Team India Next Captain) कोण?, असा सवाल आता उपस्थित होत असताना भारताचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरने (Gautam Gambhir) मोठं वक्तव्य केलंय.

गौतम गंभीरने टीम इंडियाच्या (Indian Cricket Team) अशा दोन खेळाडूंची नावं सांगितली आहेत जे भविष्यात संघाचे नेतृत्व करताना दिसू शकतात. त्यात गंभीरने स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि स्फोटक फलंदाज पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) यांचं नाव घेतलंय. हे दोन्ही खेळाडू टीम इंडियाचे कर्णधार होऊ शकतात, असा विश्वास गौतम गंभीरने (Gautam Gambhir) व्यक्त केला आहे. 

गौतम गंभीरने हार्दिक पांड्याचं नाव घेतलं हे साहजिक गोष्ट होती. मात्र, पृथ्वी शॉचं नाव घेतल्यानं अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. त्यावर बोलताना गंभीर म्हणतो..."मला वाटते की, पृथ्वी शॉ खूप आक्रमक कर्णधार बनू शकतो कारण एखादी व्यक्ती ज्या पद्धतीने खेळते त्यामध्ये तुम्ही ती आक्रमकता पाहू शकता."

आणखी वाचा - Ruturaj Gaikwad चा वर्ल्ड रेकॉर्ड! एका ओव्हरमध्ये ठोकले 7 SIX, पाहा VIDEO

दरम्यान, निवडकर्त्यांचं काम फक्त 15 निवडणं नाही तर लोकांना योग्य मार्गावर आणणं देखील आहे, असं वक्तव्य देखील गौतम गंभीरने (Gautam Gambhir On Team India) केलं आहे. पांड्या कर्णधार होण्याच्या मार्गावर आहे पण रोहितसाठी हे दुर्दैवी आहे. कारण मला वाटते की, केवळ एका आयसीसी (ICC) स्पर्धेत त्याच्या कर्णधारपदाचा न्याय करणं हा त्याच्या कर्णधारपदाचा (Indian Captain) न्याय करण्याचा योग्य मार्ग नाही, असंही पांड्या म्हणाला आहे.