मुंबई : फ्रेंच ओपनच्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात राफेल नदालनं इतिहास रचलाय. राफेलने पहिल्या सेटमध्ये 6-3, दुसरा सेट 6-3 तर, तिसरा सेट 6-0 फरकानं जिंकून चौदाव्यांदा फ्रेंच ओपनचा चॅम्पियन ठरला. तर 22 वं ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावलं.
स्पेनच्या राफेल नदालनं (Rafael Nadal) जागतिक क्रमवारीत 8 क्रमांकाच्या नॉर्वेजियन कॅस्पर रुडचा (Casper Ruud) पराभव केला. या विजयासह राफेल नदालनं चौदाव्यांदा फ्रेंच ओपनचं विजेतेपद जिंकलं. तर 22 वं ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावलं. या सामन्यातील पहिल्या सेटमध्ये राफेल नदालनं 6-3 असा विजय मिळवला. त्यानंतर राफेल नदालनं दुसरा सेट 6-3 नं जिंकला. तर, तिसरा सेट 6-0 फरकानं जिंकून तो चौदाव्यांदा फ्रेंच ओपनचा चॅम्पियन ठरला.
फ्रेंच ओपनचे जेतेपद 14व्यांदा जिंकले
राफेल नदाल पुन्हा एकदा फ्रेंच ओपनचा बादशाह बनला असून त्याने 14व्यांदा फ्रेंच ओपनचे विजेतेपद पटकावले आहे. या हंगामापूर्वी त्याने २००५, २००६, २००७, २००८, २०१०, २०११, २०१२, २०१३, २०१४, २०१७, २०१८, २०१९, २०२० मध्ये हे विजेतेपद पटकावले होते. राफेल नदाल यंदा चांगल्या फॉर्ममध्ये आहे. या वर्षी त्याने ऑस्ट्रेलियन ओपनही जिंकली आहे.