IPL 2021: बेन स्टोक्सनंतर राजस्थान संघातील आणखी एक खेळाडू IPL बाहेर

बेन स्टोक्स पाठोपाठ आता आणखी एक खेळाडू IPLमधून बाहेर, राजस्थान रॉयल्सचं टेन्शन वाढलं.

Updated: Apr 21, 2021, 12:18 PM IST
IPL 2021: बेन स्टोक्सनंतर राजस्थान संघातील आणखी एक खेळाडू IPL बाहेर

मुंबई: यंदा IPLवर कोरोनाचं महासंकट आहे. या महासंकटाचा सामना करत असतानाच IPLमधील राजस्थान रॉयल्स संघाला दुसरा मोठा धक्का बसला आहे. संघातील स्टार खेळाडू IPL बाहेर गेल्याची माहिती मिळाली आहे. बेन स्टोक्सच्या हाताला दुखापत झाल्यानं तो IPLमधून बाहेर गेला होता. त्यापाठोपाठ आणखी स्टार खेळाडू बाहेर पडल्यानं संघाचं टेन्शन वाढलं आहे.

दुखापतीमुळे इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स या हंगामात आयपीएलमधून बाहेर झाला आहे. त्याच्या पाठोपाठ आणखी एक संघातील खेळाडू IPLमधून बाहेर पडला आहे. थकवा जाणवत असल्यानं लीम लिव्हिंगस्टोन याने IPLमधून माघार घेतली आहे.

थकवा जाणवू लागल्यामुळे लियाम इंग्लंडला सोमवारी रात्री निघून गेला आहे. फ्रेंचायझीने त्याला जाण्याची परवानगी देखील दिल्याची माहिती मिळाली आहे. संघाने देखील निर्णयाचा आदर केला असून सर्वजण या क्रिकेटपटूला पाठिंबा देत आहेत असंही सांगण्यात आलं आहे. 

बेन स्टोक्सच्या बोटाला पंजाब विरुद्धच्या सामन्यात कॅच पकडताना दुखापत झाली. त्याच्या बोटावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्यानं तो 12 आठवड्यांसाठी मैदानापासून दूर राहणार आहे. त्यापाठोपाठ आणखी एक इंग्लडच्या खेळाडूनं स्पर्धेतून माघार घेतल्यानं राजस्थान रॉयल्स संघाला मोठा धक्का बसला आहे.