Ravi Shastri On Virat Kohli : विराट कोहली (Virat Kohli) याचा फॉर्म गेला, काही दिवसातच त्याच्या हातातून टीम इंडियाच्या (Team India) जबाबदाऱ्या देखील गेल्या. त्यानंतर मात्र, विराटने जबरदस्त कमबॅक करत आपला फॉर्म पुन्हा कमवला. आता तो आयपीएलमध्ये (IPL 2023) देखील चांगल्या फॉर्मात आहे. एवढंच काय तर नियमित कर्णधार फाफच्या अनुपस्थितीत तो आरसीबीची (RCB) धुरा देखील सांभाळतोय. अशातच आता टीम इंडियाचे माजी कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी मोठं वक्तव्य केलंय.
मला वाटतं विराट कोहली (Virat Kohli) टीमचं नेतृत्व करू शकतो. इंग्लंडविरूद्धच्या बर्मिंगहॅम कसोटीत (Ravi Shastri on Edgbaston Test) रोहित दुखापतग्रस्त होता तेव्हा विराट कोहलीने टीम इंडियाचं नेतृत्व करावं अशी त्यांची अपेक्षा होती. त्यावेळी रोहितच्या अनुपस्थितीत बुमराहवर जबाबदारी होती. त्याआधी विराटच्या नेतृत्वाखाली भारताने मालिका (IND vs ENG) जिंकली होती, असं रवी शास्त्री (Ravi Shastri On Virat Kohli) सांगतात.
रोहित शर्माला (Rohit Sharma) कोरोनाची लागण झाल्यामुळे खळणार नव्हता. मला वाटलं की विराट कोहली संघाचे नेतृत्व करेल. त्याच्याकडे ती क्षमता आहे. अशा परिस्थितीत मी नक्कीच विराटला विचारलं असतं. मला आशा आहे की, कोच राहुलने नक्कीच विराटला याबाबत विचारलं असावं. मला याबाबत माहिती नाहीये, माझं बोलणं झालं नाही. मात्र मी बोर्डाला त्याचीच शिफारस केली असती कारण मालिकेचं नेतृत्व विराटच केला होता, असं रवी शास्त्री यांनी म्हटलं आहे.
आणखी वाचा - Sunil Gavaskar: रोहित शर्माचा फॉर्म सुधरेना, लिटिल मास्टर म्हणतात...
विराट कोहलीला एकमात्र टेस्ट सामन्यात कॅप्टन्सी करण्यात अवघड होतं का? असा सवाल रवी शास्त्री यांना विचारला होता. त्यावर त्यांनी नाही, असं उत्तर दिलं. देशासाठी नेतृत्व करणं ही सन्मानाची गोष्ट आहे. अशा परिस्थितीत सर्वोच्च कामगिरी करणं गरजेचं आहे. आपला नियमित कॅप्टन टीमचा हिस्सा नाही तर इंग्लंडला इंग्लंडमध्ये हरवण्याची संधी होती. असं कोणता संघ आहे, ज्याने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाला एकाच वर्षात हरवलंय? असं म्हणत त्यांनी अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत.