INDvsAUS: विजयानंतरचा ड्रेसिंग रुममधला Video व्हायरल

रवी शास्त्रींकडून संघाचं कौतुक 

Updated: Jan 20, 2021, 01:39 PM IST
INDvsAUS: विजयानंतरचा ड्रेसिंग रुममधला Video व्हायरल  title=

मुंबई : ऑस्ट्रेलियाला त्यांच्यात मातीत हरवल्यानंतर जगभरात भारतीय संघाचा डंका पसरला. पहिल्या टेस्टमध्ये ३६ धावांमध्येच खेळ संपवल्यानंतर ब्रिस्बेन टेस्टमध्ये भारतीय संघ विजयी झाला. हा विजय कोणत्या स्वप्नापेक्षा कमी नव्हता. कर्णधार विराट कोहली आणि काही दिग्गज मंडळींच्या गैरहजेरीत फक्त तरूणांच्या प्रयत्नाने हा विजय मिळवला. यानंतर कोच रवी शास्त्री यांनी खेळाडूंच ड्रेसिंग रुममध्ये जाऊन कौतुक केलं. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

बीसीसीआय डॉट टीव्हीवर अपलोड झालेल्या या ४ मिनिटं ११ सेकंदाच्या या व्हिडिओची सुरूवात विजयानंतरच्या आनंदाने झाली आहे. एकमेकांना आलिंगन देत एकमेकांचा उत्साह वाढवत तिरंगा गाबा मैदानात फडकावला. ट्रॉफी हातात उचलून कॅप्टन रहाणेच्या चेहऱ्यावर भरपूर आनंद दिसत होता.

 विजयानंतर भारतीय संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे (captain Ajinkya Rahane) आणि प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी भारतीयांसमोर आपले मन मोकळे केले आहे. कोव्हिड परिस्थिती आणि भारतीय संघातल्या इन्ज्युरीजचा विचार करता या नव्या मुलांनी केलेली कामगिरी कल्पना करण्यापलिकडली आहे, अशा शब्दांत त्यांनी भारतीय संघाची पाठ थोपटलीय. तर आम्ही रिझल्टचा विचार नाही केला आम्ही केवळ खेळत राहिलो. हा सांघिक विजय असल्याची प्रतिक्रिया अजिंक्य रहाणेने दिली आहे.

टीम इंडियाचे अनेक खेळाडू या सामन्या दरम्यान जखमी झाले होते. अशी अनेक संकंट आली ज्यामुळे भारत हा सामना जिंकू शकणार नाही, असे वाटत होते. मात्र भारतीय खेळाडूंनी संघर्ष करत हा सामना जिंकला. एडिलेडमध्ये पहिला सामना हरल्यानंतर टीम इंडियाने चांगलं कमबॅक केले आहे.