नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचा राहणारा रितेश कुमार सिनिअर नॅशनल अथलेटिक्स स्पर्धेतील स्पर्धक आहे. पण त्याचा इथपर्यंत पोहचण्याचा मार्ग फारच खडतर होता.
आपल्या भावाबहिणीपेक्षा मोठा असल्याने, रितेशवर घर चालवण्याची देखील जबाबदारी होती. यासाठी गुडगावमध्ये घरोघरी गॅस सिलेंडर पोहोचवण्याची त्याच्याकडे जबाबदारी होती. या कामाचे त्याला दर महिन्याला ९ हजार रूपये मिळत होते, ज्यातील जास्तच जास्त पैसे तो घरी पाठवत असे.
नोकरी करत असताना रितेशने आपली प्रॅक्टीस सोडली नाही. रोज सकाळी ८ वाजता ते दुपारी ३.३० पर्यंत लोकांच्या घरी जावून सिलिंडर पोहचवण्याचं काम रितेश करत असे, यानंतर ४.३० ते सायंकाळी ७ पर्यंत जोरदार मेहनत देखील घेत असे.
रितेशने सांगितल्यानुसार, २५ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर दरम्यान ओरिसातील भुवनेश्वर सिनिअर नॅशनल एथलेटिक्स स्पर्धेत ५ किमी रनसाठी त्याची निवड झाली.
रितेश यांच्या कोचने म्हटलंय की, रितेश हा एक मेहनती आहे. या मेहनतीमुळे त्याने राष्ट्रीय स्तरावर जागा मिळवली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील तो आपली दावेदारी पक्की करणार आहे, आणि देशासाठी तो नक्की मेडल जिंकून आणणार आहे.
सध्या गुडगावच्या एका गावात कासनमध्ये तो राहतो, सेक्टर ३८ मधील ताऊ देवीलाल स्टेडिअममध्ये तो प्रॅक्टीस करत असतो.