मध्य प्रदेशातील एका प्रोबेशनरी आयपीएस अधिकाऱ्याचा रविवारी कर्नाटकच्या हसन जिल्ह्यात त्याच्या पहिल्या पोस्टिंगवर पदभार स्वीकारण्यासाठी जात असताना रस्ते अपघातात त्याचा मृत्यू झाला. कर्नाटक केडरचे 2023 बॅचचे 26 वर्षीय अधिकारी हर्षबर्धन यांनी नुकतंच म्हैसूर येथील कर्नाटक पोलीस अकादमीमध्ये प्रशिक्षण पूर्ण केलं होतं.
हसनपासून अंदाजे 10 किमी अंतरावर असलेल्या किटणेजवळ दुपारी 4.20 च्या सुमारास ही संपूर्ण घटना घडली. हसन जिल्हा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षबर्धन ज्या पोलीस वाहनातून प्रवास करत होते त्याचा टायर फुटला. टायर फुटल्यामुळे चालक असणारे जिल्हा सशस्त्र राखीव (DAR) दलाचे कॉन्स्टेबल मंजेगौडा यांचं नियंत्रण सुटलं. त्यानंतर वाहन एका घरावर आणि रस्त्यालगतच्या झाडावर आदळलं. हर्षबर्धन यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना हसन येथील जनप्रिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना बंगळुरू येथील रुग्णालयात हलवण्याचे प्रयत्न करूनही त्याचा मृत्यू झाला. चालक मंजेगौडा हा किरकोळ जखमी झाला असून त्याच्यावर हसन येथे उपचार सुरू आहेत.
We lost our 2023 batch IPS Probationer Harsha Vardhan to a road accident this evening near Hassan. After finishing training at KPA he was proceeding to Hassan for District training
Young & precious life lost
“#Road safety needs due attention at all levels”
Deeply saddened pic.twitter.com/EaNyY1JySK
— alok kumar (@alokkumar6994) December 1, 2024
मध्य प्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यातील दोसर गावातील मूळ रहिवासी असलेले हर्षबर्धन होलेनरसीपूर येथे सहाय्यक पोलिस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारण्यासाठी हसनला जात होते. त्याचे कुटुंब मूळचे बिहारचे असून वडील अखिलेश हे उपविभागीय दंडाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. स्थापत्य अभियंता असलेल्या हर्बर्धन यांनी अपघातापूर्वी सहा महिन्यांचे जिल्हा प्रात्यक्षिक प्रशिक्षण हसन येथे पूर्ण केलं होतं.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीदेखील हर्षबर्धन यांच्या मृत्यूनंतर शोक व्यक्त केला आहे. एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, "जेव्हा अनेक वर्षांच्या मेहनतीचे फळ मिळत होते तेव्हा असं घडू नये".
"हसन-म्हैसूर महामार्गावरील कित्ताणे सीमेजवळ झालेल्या भीषण अपघातात प्रोबेशनरी IPS अधिकारी हर्षवर्धन यांच्या मृत्यूबद्दल ऐकून दुःख झाले. ते आयपीएस अधिकारी म्हणून पदभार स्वीकारण्यासाठी जात असताना असा अपघात झाला आहे, ही अत्यंत खेदजनक बाब आहे. वर्षानुवर्षे केलेल्या मेहनतीचे फळ मिळत असताना असं घडायला नको होतं. हर्षवर्धन यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना," असं ते म्हणाले आहेत.
ಹಾಸನ - ಮೈಸೂರು ಹೆದ್ದಾರಿಯ ಕಿತ್ತಾನೆ ಗಡಿ ಬಳಿ ಸಂಭವಿಸಿದ ಭೀಕರ ಅಪಘಾತದಲ್ಲಿ ಪ್ರೊಬೆಷನರಿ ಐಪಿಎಸ್ ಅಧಿಕಾರಿ ಹರ್ಷಬರ್ಧನ್ ಅವರು ನಿಧನರಾದ ವಿಷಯ ತಿಳಿದು ದುಃಖವಾಯಿತು.
ಐಪಿಎಸ್ ಅಧಿಕಾರಿಯಾಗಿ ಅಧಿಕಾರ ಸ್ವೀಕರಿಸಲು ತೆರಳುತ್ತಿದ್ದ ವೇಳೆ ಇಂಥದ್ದೊಂದು ದುರ್ಘಟನೆ ಜರುಗಿದೆ ಎನ್ನುವುದು ಬಹಳಾ ಬೇಸರದ ಸಂಗತಿ. ವರ್ಷಗಳ ಕಠಿಣ ಪರಿಶ್ರಮ ಫಲ… pic.twitter.com/VwU86Irabi
— Siddaramaiah (@siddaramaiah) December 2, 2024
माजी मुख्यमंत्री सदानंद गौडा यांनीही एक्सवर पोस्ट शेअर करत शोक व्यक्त केला आहे.