Rohit Sharma: वर्ल्डकप जिंकण्याचं सर्व भारतीयांचं स्वप्न ऑस्ट्रेलिया टीमने एका रात्रीत धुळीत मिसळवलं. यानंतर सर्व क्रिकेट चाहते नाराज झाले आहे. मात्र आता चाहत्यांचं लक्ष्य नवीन वर्षात होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपवर आहे. अशातच सर्वांच्या मनात प्रश्न आहे की, वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाची धुरा कोण सांभाळणार? यावर भारताचा माजी खेळाडू मोहम्मद कैफने मोठं विधान केलं आहे.
भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफचं असं मत आहे की, जरी टीम इंडियाचा पराभव झाला असला तरीही रोहित शर्माचे नेतृत्व पूर्वीपेक्षा अधिक चांगलं होताना दिसतंय. 2024 च्या T20 वर्ल्डकप स्पर्धेत टीमचं नेतृत्व करण्यासाठी तुम्हाला रोहित शर्मा फलंदाजापेक्षा कर्णधार म्हणून त्याची अधिक गरज आहे.
वनडे वर्ल्डकपमध्ये झालेल्या पराभवानंतर टी-20 वर्ल्ड कपपूर्वी रोहित शर्माच्या भवितव्यावर प्रश्न उपस्थित केले जातायत. अशा परिस्थितीत रोहित शर्मा टी-20 फॉर्मेटमध्येही टीम इंडियाचं नेतृत्व करत राहणार की काही नव्या खेळाडूकडे ही जबाबदारी देणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मोहम्मद कैफने एका मिडीयाशी बोलताना सांगितलं की, रोहित शर्माला टी-20 फॉर्मेटमध्ये राहणं आवश्यक आहे. 50 ओव्हर्सच्या वर्ल्डकपमध्ये त्याने ज्या प्रकारे नेतृत्व केलं ते कौतुकास्पद होतं. हार्दिक पंड्या शिवाय तुम्ही टीमला अंतिम फेरीत नेलं याचं तुम्हाला कौतुक वाटलं पाहिजे. भारताला टी-20 मध्येही रोहितचा अनुभव हवा आहे. रोहितने कर्णधार आणि फलंदाज म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली, ज्याची भारताला T20 मध्ये देखील आवश्यकता असेल.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या टेस्ट टीममध्ये चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांची निवड न करण्यावरही प्रश्न उपस्थित केले जातायत. यावर कैफ म्हणाला, 'मला माहित नाही की पुजाराची निवड का झाली नाही. तुमच्या प्रमुख फलंदाजाशिवाय तुम्ही आफ्रिकन दौऱ्यावर जाऊ शकत नाही. सध्याचा किंवा भूतकाळातील फॉर्मवर तुम्ही अवलंबून राहू शकत नाही, तुम्हाला सर्वात जास्त गरज असते ती अनुभवाची.'
रोहित शर्मा (C), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, इशान किशन (WK), केएल राहुल (WK), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, मोहम्मद. शमी*, जसप्रीत बुमराह (VC), प्रसिद्ध कृष्णा.
यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव (C), रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन (WK), जितेश शर्मा (WK), रवींद्र जडेजा (VC), वॉशिंग्टन सुंदर , रवी बिश्नोई, कुलदीप यादव,अर्शदीप सिंग, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, दीपक चहर.