सचिन आपल्याला कायमच प्रेरणास्थानी - सेहवाग

 भारतरत्न सचिन तेंडुलकरनं वीरेंद्र सेहवागला एक BMW सीरिजची गाडी भेट म्हणून दिलीय.

Updated: Sep 28, 2017, 04:08 PM IST
सचिन आपल्याला कायमच प्रेरणास्थानी - सेहवाग title=

मुंबई : भारतरत्न सचिन तेंडुलकरनं वीरेंद्र सेहवागला एक BMW सीरिजची गाडी भेट म्हणून दिलीय. ही कार मिळाल्यानंतर सेहवागनं ट्विट करुन सचिनचे आभार मानलेत.  थँक्यू पाजी आणि थँक्यू BMW इंडिया असं ट्विट सेहवागनं केलंय. सचिननं गिफ्ट दिलेल्या या कारबरोबर सेहवागनं स्वतःचा फोटोही शेअर केलाय. 

या कारची किंमत तब्बल 1 कोटी 14 लाख इतकी आहे. सचिन आणि सेहवाग ही टीम इंडियाची ओपनिंगची फेवरेट जोडी होती. या दोघांच्या नावावर पार्टनरशिपचे अनेक रेकॉर्ड आहेत. सेहवागनं कायमच सचिन आपल्याला प्रेरणास्थानी असल्याचं म्हंटलं होतं. तर सेहवागनं जेव्हा निवृत्तीची घोषणा केली, त्यावेळी सचिननं सेहवागचा उल्लेख खरा चॅम्पियन असा करत त्याचं कौतुक केलं होतं.