सायनाने नॅशनल बॅडमिंटन चॅम्पियनशिपवर नाव कोरले

नॅशनल बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये सायना नेहलवाने बाजी मारली. सायनानं रंगतदार लढतीत पी.व्ही.सिंधूचा पराभव केला. सायनानं सिंधूवर 21-17, 27-25 नं मात करत नॅशनल बॅडमिंटन चॅम्पियनशिपवर आपलं नाव कोरलं.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 9, 2017, 12:01 AM IST
सायनाने नॅशनल बॅडमिंटन चॅम्पियनशिपवर नाव कोरले title=

नवी दिल्ली : नॅशनल बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये सायना नेहलवाने बाजी मारली. सायनानं रंगतदार लढतीत पी.व्ही.सिंधूचा पराभव केला. सायनानं सिंधूवर 21-17, 27-25 नं मात करत नॅशनल बॅडमिंटन चॅम्पियनशिपवर आपलं नाव कोरलं.

चित्तथरारक लढतीत सायना आणि सिंधूनं एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अखेर सायनाचा अनुभव कामी आला आणि तिला सिंधूवर मात करण्यात यश आलं. 

सायना आणि सिंधूची ही मॅच नागपूरकरांसाठी स्पेशल ट्रीट ठरली. याआधी अनेक मॅचमध्ये या दोघी आमने-सामने आल्या होत्या. आणि पुन्हा नॅशनल बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये या दोघी समोरा-समोर आल्यानं बॅडमिंटन चाहते खूष झाले.