मानलं राव! 'मॅन ऑफ द टूर्नामेंट'च्या पुरस्कारासह अशी कामगिरी करणारा जगातील पहिला खेळाडू

मानलं पोराला! वर्ल्ड कपमध्ये अशी कामगिरी करणारा जगातील पहिलाच खेळाडू  

Updated: Nov 13, 2022, 08:42 PM IST
मानलं राव! 'मॅन ऑफ द टूर्नामेंट'च्या पुरस्कारासह अशी कामगिरी करणारा जगातील पहिला खेळाडू title=

Eng vs Pak Final 2022 : इग्लंड संघाने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारत टी-20 वर्ल्ड कप 2022 आपल्या नावावर केला आहे.  या स्पर्धेमध्ये अनेक चुरशीचे सामने पाहायला मिळाले. सर्व संघ तयारीनिशी मैदानात उतरले होते अखेर यंदाच्या वर्षीचा टी-20 चॅम्पियन इंग्लंड संघ ठरला आहे. अंतिम सामन्यानंतर 'मॅन ऑफ द टूर्नामेंट' आणि 'मॅन ऑफ द मॅच' दोन्ही पुरस्कार मिळवणारा सॅम करन हा पहिलाच खेळाडू ठरला आहे. (Sam Curran became the first player to win both Man of the Tournament and Man of the Match awards T-20 World Cup 2022)

सॅम करनने फायनल सामन्यामध्ये 4 ओव्हरमध्ये 12 धावा देत 3 गडी बाद केले. पाकिस्तानच्या फलंदाजीचं कंबरडं मोडण्यात करनने महत्त्वाची भूमिका बजावली. करनने धोकादायक मोहम्मद रिझवानला बाद करत पाकिस्तानला सुरूवातीलाच धक्का दिला. त्यानंतर आदिल राशिद आणि ख्रिस जॉर्डन यांनी प्रत्येकी 2 गडी बाद करत पाकिस्तानला 137 धावांवर रोखलं. 

सॅम करनने या स्पर्धेमध्ये अष्टपैलू कामगिरी केली आहे. तसेच टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये एका मॅचमध्ये 5 विकेट्स घेणारा एकमेव गोलंदाज आहे. बेस्ट बॉलिंग फिगरही करनचीच आहे, 3.4 ओव्हरमध्ये 10 धावा देत 5 विकेट्स घेतल्या होत्या तर त्याने स्पर्धेमध्ये 6 सामन्यांमध्ये 13 विकेट्स घेतल्या आहेत. 

दरम्यान, सॅम करन हा वर्ल्ड कपमधील अंतिम सामन्यातील 'मॅन ऑफ द मॅच' आणि 'मॅन ऑफ द टूर्नामेंट' हे दोन्ही पुरस्कार पटकावणारा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. महत्त्वाचं म्हणजे सॅमचा पहिलाच वर्ल्ड कप होता.