सौंदर्यात बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा कमी नाही अक्षर पटेलची होणारी पत्नी, लवकरच अडकणार विवाह बंधनात

श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या अक्षर पटेलने (Axar Patel) लग्नासाठी न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून सुट्टी घेतली आहे  

Updated: Jan 20, 2023, 06:19 PM IST
सौंदर्यात बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा कमी नाही अक्षर पटेलची होणारी पत्नी, लवकरच अडकणार विवाह बंधनात title=

Axar Patel Wife Photo : भारतीय टीमचा (Team India) अष्टपैलू अक्षर पटेलने (Axar Patel) गेल्या काही सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (International Cricket) आपली छाप उमटवली आहे. आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर अक्षर पटेलने टीम इंडियात आपली जागा पक्की केली आहे. रवींद्र जडेजाला दुखापत (Ravindra Patel Injured) झाली आणि अक्षर पटेलला टीम इंडियात संधी मिळाली. या संधीचं अक्षर पटेलने सोनं केलं. श्रीलंकेविरुद्ध नुकत्याच झालेल्या टी20 मालिकेत अक्षर पटेलने 117 धावा आणि तीन विकेट घेत अष्टपैलू कामगिरी केली.  (Axar Patel All-round performance against Sri Lanka)

अक्षर पटेल लवकरच विवाहबंधनात अडकणार
अक्षर पटेल लवकरच आणखी एक चांगली बातमी देणार आहे. अक्षर पटेल विवाह बंधनात (Akshar Patel Marriage) अडकणार आहे. या कारणानेच अक्षरने न्यूझीलंडविरुद्ध सुरु असलेल्या मालिकेतून सुट्टी घेतली आहे. अक्षर पटेलऐवजी टीम इंडियात वॉशिंग्टन सुंदरला संधी देण्यात आली आहे. लग्न समारंभ उरकल्यानंतर अक्षर ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी उपलब्ध असणार आहे. (India vs Australia Test Seires)

बीसीसीआयने दिली सुट्टी
भारत आणि दिल्ली कॅपिटल्सचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल मेहा पटेलबरोबर (Meha Patel) लग्न बंधनात अडकणार आहे. याचसाठी बीसीसाआयने (BCCI) त्याची सुट्टीही मंजूर केली आहे. कोणत्या तारखेला अक्षर आणि मेहा यांचं लग्न (Axar-Meha Marriage) होणार आहे, हे अजून स्पष्ट झालेलं नाही. अक्षर आणि मेहा अनेक काळापासून एकमेकांना डेट करतात. 20 जानेवारी 2022 मध्ये दोघांचा साखरपुडा पार पडला. अक्षर आणि मेहा सोशल मीडियावरही चांगलेच सक्रिय असतात. आपले अनेक फोटो ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. सध्या हे लव्ह बर्ड लग्नाच्या तयारीत व्यस्त आहेत. अक्षर आणि मेहाचा लग्नसोहळा चार दिवस चालणार असल्याचं सांगितलं जातंय.

गुजरातमध्ये होणार लग्न सोहळा
अक्षर पटेलचं लग्न गुजराती पारंपारीक पद्धतीन पार पडणार आहे. अक्षर आणि मेहाच्या लग्नात केवळ जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य सहभागी होणार असून गुजरातमधल्या एका हॉटेलमध्ये हा सोहळा पार पडणार आहे. 

मेहा आहे आहारतज्ज्ञ
मेहा ही व्यवसायाने डायटीशियन (Dietician) आणि न्यूट्रिशियनिस्ट (Nutritionist) आहे. तसंच तिला ट्रॅव्हलिंगची (Traveller) आवड आहे. सोशल मीडियावर आपल्या ट्रॅव्हिलिंगचे अनेक फोटो ती शेअर करते. मेहाने आपल्या हातावर अक्षरच्या नावाचा टॅटू कोरला आहे. मेहाच्या 28 व्या वाढदिवशी अक्षर पटेलने तिला प्रपोज केलं होतं. यानंतर दोघांचा साखरपुडाही पार पडला. साखरपुड्याचे फोटो अक्षरने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले होते.