Sania Mirza Shoaib Malik Net Worth: भारतीय महिला टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक (Shoaib Malik) दोघेही घटस्फोटामुळे चर्चेत आले आहेत. मीडियामध्ये सानिया आणि शोएबने घटस्फोट (Sania Mirza Shoaib Malik) घेतल्याच्या बातम्या पसरल्या आहेत.मात्र यावर अद्याप दोघांनीही प्रतिक्रिया दिली नाही आहे. तरीही त्यांच्या घटस्फोटोच्या चर्चा थांबत नाही आहेत. या सर्वात आता शोएब मलिक (Shoaib Malik) आणि सानिया मिर्झा (Sania Mirza) यांच्या एकूण संपत्ती आणि कमाईबद्दल जाणून घेऊयात.
हे ही वाचा : वर्ल्ड कपमध्ये खेळायची संधीच मिळाली नाही, धनश्रीने लिहली चहलसाठी खास पोस्ट
भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza Divorce) टेनिस खेळून भरपूर पैसे कमावते. सानिया मिर्झा वर्षाला करोडो रुपये कमवते. सानिया मिर्झाचे वार्षिक अंदाजे उत्पन्न सुमारे 3 कोटी रुपये असेल.खेळाव्यतिरिक्त, सानिया अनेक ब्रँड एंडोर्समेंटद्वारे पैसे कमवते. ती ब्रँड एंडोमेंटसाठी 25 कोटी रुपये घेते. त्याचवेळी, अनेक शीर्ष ब्रँडशी देखील संबंधित आहेत. सानियाची स्वतःची टेनिस अकादमी देखील आहे.
हे ही वाचा : T20 World Cup की FIFA? कोणत्या स्पर्धेतून खेळाडूंना सर्वाधिक पैसे मिळतात, जाणून घ्या
सानिया मिर्झाप्रमाणेच तिचा पती शोएब मलिकही (Shoaib Malik Divorce) पाकिस्तानच्या अव्वल खेळाडूंपैकी एक मानला जातो. मलिकने आपल्या शानदार फलंदाजीमुळे पाकिस्तानला अनेक वेळा सामने जिंकून दिले आहेत.त्याचवेळी शोएब मलिकची संपत्तीही सानिया मिर्झाच्या जवळपास आहे. मीडिया रिपोर्टनुसार, शोएबची एकूण संपत्ती 28 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच जवळपास 228 कोटी रुपये आहे. त्याच्या कमाईचा मोठा हिस्सा खेळातून येतो. यासोबतच शोएब ब्रँड एंडोर्समेंटमधूनही कमाई करतो.
हे ही वाचा : IPLच्या प्रश्नावर बाबर आझमची बोलती बंद, VIDEO आला समोर
दरम्यान दोघांची संपत्ती पाहिली तर सर्वाधिक संपत्ती शोएब मलिकची (Shoaib Malik Divorce) आहे.सध्या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा आहेत. मात्र या चर्चावर किती खऱ्या आहेत व खोट्या आहेत? हे त्यांच्या नात्यावरील प्रतिक्रियेनंतर कळणार आहे.