पर्थ : टी20 वर्ल्ड कपमधून (T20 World Cup) टीम इंडिया बाहेर झाली आहे. सेमी फायनल सामन्यात टीम इंडियाचा (Team India) इंग्लंडने 10 विकेट राखून पराभव केला आहे. या पराभवानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंवर सडकून टीका होतेय. त्यात काही खेळाडू असे देखील आहेत जे वर्ल्ड कपमध्ये एकही सामना खेळले नाही आहेत. मात्र तरीही पराभवानंतर त्यांच्यावर निषाणा साधला आहे.यामध्ये युझवेंद्र चहल आणि दिपक हुड्डाच नाव आघाडीवर आहे. त्यात आता धनश्री वर्माने (Dhanashree verma) युझवेंद्र चहलसाठी खास पोस्ट लिहली आहे. या पोस्टची खुप चर्चा रंगली आहे.
हे ही वाचा : T20 World Cup की FIFA? कोणत्या स्पर्धेतून खेळाडूंना सर्वाधिक पैसे मिळतात, जाणून घ्या
टीम इंडियाचा स्पिनर गोलंदाज युजवेंद्र चहलला (yuzvendra chahal) टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र, टीम इंडिया वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यानंतर युझवेंद्र चहल खूपच निराश झाला आहे. अशा प्रसंगी युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माने (Dhanashree verma) क्रिकेटर पतीसाठी एक खास संदेश लिहिला आहे. यामध्ये धनश्रीने तिला तिच्या पतीचा अभिमान असल्याचे सांगत पाठिंबा दिला आहे.
हे ही वाचा : IPLच्या प्रश्नावर बाबर आझमची बोलती बंद, VIDEO आला समोर
धनश्रीने (Dhanashree verma) चहलसाठी (yuzvendra chahal) इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट लिहली आहे. या पोस्टमध्ये तिने पतीसोबतचे काही फोटो शेअर केले आणि कॅप्शन लिहली की, "माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि मला तुझा खूप अभिमान आहे. प्रत्येक दिवस… प्रत्येक क्षण, असा भावनिक संदेश तिने लिहला आहे.
दरम्यान दुसऱ्या सेमी फायनल सामन्यात टीम इंडियाने (Team India) इंग्लंडसमोर 169 धावांचे लक्ष्य ठेवले होते.हे लक्ष्य इंग्लंडच्या खेळाडूंने सहज पुर्ण करत 10 विकेट्सने राखून विजय मिळवला. इंग्लंडच्या या विजयानंतर टीम इंडिया वर्ल्ड कपमधून (T20 World Cup) बाहेर झाली.