पती, पत्नी आणि शो... सानिया-शोएबचा तलाक होणार? कहाणीत नवा ट्विस्ट

सानिया मिर्झा आणि शोएब मलिकचा खरच तलाक होणार? की यामागे आणखी काही...

Updated: Nov 14, 2022, 07:04 PM IST
पती, पत्नी आणि शो... सानिया-शोएबचा तलाक होणार? कहाणीत नवा ट्विस्ट title=

Sania Mirza Shoaib Malik divorce : 'पती, पत्नी और वो' ही फिल्मी कहाणी तुम्ही ऐकलीच असेल. पण सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांची कहाणी थोडी हट के आहे. 'पती, पत्नी और शो...' अशी ही नवी स्टोरी आहे. त्याचं झालं असं की, भारताची टेनिसस्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांचा तलाक होणार अशी चर्चा सध्या रंगलीय. इस्लामाबादपासून हैदराबादपर्यंत आणि दुबईपासून मुंबईपर्यंत सध्या ज्याच्या त्याच्या तोंडी हाच विषय आहे. 

शोएब मलिक आणि पाकिस्तानी मॉडेल आयशा उमर यांनी एकत्र बोल्ड फोटोशूट केलं. नेमका हाच धागा पकडून पतंगबाजी सुरू झाली. शोएब आणि आयशाचं अफेअर असल्याचं बोललं जाऊ लागलं. या  अफेअरवर नाराज असलेली सानिया त्याला तलाक देणाराय. त्याबाबतचे कायदेशीर सोपस्कार लवकरच पार पडणार असल्याचंही सांगण्यात आलं. पण अखेर ही अफवाच ठरण्याची शक्यता आहे. कारण या दोघांनी एका टीव्ही शोच्या प्रमोशनसाठी तलाकचा ड्रामा रचल्याची बाब आता समोर आलीय.

पती, पत्नी और शो
द मिर्झा मलिक शो असं या नव्या टीव्ही शोचं नाव असणार आहे. लवकरच ऊर्दूफ्लिक्स नावाच्या पाकिस्तानी चॅनलवर तो प्रसारित होणार आहे. 
सानिया आणि शोएब हे स्टार कपल या शोचे होस्ट असणार आहेत. दुबईमध्ये कार्यक्रमाचं शुटिंग पार पडणार आहे. भारत आणि पाकिस्तानातील बड्या सेलिब्रेटिंना या शोमध्ये एकत्र चर्चेसाठी आणलं जाणाराय

आता खरोखरच या दोघांनी द मिर्झा मलिक शोच्या प्रमोशनसाठी जाणीवपूर्वक तलाकचं कुभांड रचलं की, खरंच दोघांमध्ये तलाक होणाराय...? शो तो अभी बाकी है मेरे दोस्त.