मुंबई : महान फलंदाज सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असते. सारा इंस्टाग्रामवर लोकप्रिय असून तिचे 2 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. IPL 2022 मध्ये मुंबई इंडियन्सला सपोर्ट करण्यासाठी सारा मैदानात दिसली होती, त्यावेळी साराच्या सौंदर्याचंही मोठ्या प्रमाणात कौतुक झालं होतं. मात्र गेल्या 10 वर्षांपासून सारा एका समस्येशी लढा देतेय, याची फारच कमी लोकांना कल्पना असेल.
जरी सेलेब्स अनेकदा सोशल मीडियावर त्यांचा बेस्ट फोटो शेअर करतात. पण सचिन तेंडुलकरची मुलगी साराने इंस्टाग्राम स्टोरीवर लोकांना प्रेरणा देण्यासाठी एक फोटो शेअर केलाय. साराने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या चेहऱ्यावर काही डाग आणि मुरुम असल्याचं दिसतंय. हा फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करत साराने एक हृदयस्पर्शी कहाणी देखील लिहिलीये.
साराने तिच्या स्टोरीवर ही पोस्ट शेअर केली आणि लिहिलंय, "10 वर्षांपासून सातत्य ठेवल्यामुळे माझी त्वचा बरी झालीये. त्यानंतर आज माझी त्वचा बदलली आहे.'
सारा तेंडुलकरचा भाऊ अर्जुन तेंडुलकर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या टीमचा एक भाग आहे. अर्जुनला सपोर्ट करण्यासाठी सारा मुंबई इंडियन्सची जर्सी घालून मैदानात दिसली होती.
साराने काही दिवसांपूर्वीच मॉडेलिंगमध्ये पदार्पण केलं होतं. काही महिन्यांपूर्वी तिने तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये सौंदर्याचं रहस्य सांगितलं होतं.