टीम डेविडला आऊट होताना पाहून सारा SHOCK, स्टेडियममध्येच केलं असं काही.... पाहा व्हिडीओ

खेळात 4 षटकारांनी रंगत आणणाऱ्या टीम डेविडला आऊट होताना पाहून साराने अशी दिली रिअॅक्शन, पाहा 

Updated: May 18, 2022, 09:05 AM IST
टीम डेविडला आऊट होताना पाहून सारा SHOCK, स्टेडियममध्येच केलं असं काही.... पाहा व्हिडीओ  title=

मुंबई : आयपीएलमध्ये सामने आता प्लेऑफच्या दिशेनं जात आहेत. हैदराबाद टीमला पुन्हा प्लेऑफपर्यंत पोहोचण्याची आशा निर्माण झाली आहे. हैदराबादने मुंबईचा तीन धावांनी पराभव केला. शेवटच्या दोन ओव्हरमध्ये बाजी पटलटी. टीम डेविड क्रिझवर आल्यानंतर मुंबईला सामना जिंकण्याच्या आशा पल्लवीत झाल्या. 

हैदराबादने 6 विकेट्स गमावून 193 धावा केल्या. तर मुंबईसमोर 194 धावांचं आव्हान ठेवलं. लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईला 7 विकेट्स गमावून 190 धावा करता आल्या. मुंबईचा हा यंदाच्या हंगामातील दहावा पराभव आहे. 

17 व्या ओव्हरमध्ये मुंबईने 5 गडी गमावून 149 धावा केल्या होता. शेवटच्या तीन ओव्हर खूपच रंजक होत्या. क्रिझवर टीम डेविड आला. त्याने एकाच ओव्हरमध्ये चार चौकार ठोकले. ज्यामुळे टीमच्या जिंकण्याच्या आशा वाढल्या. 

व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

टी नटराजनच्या बॉलवर सलग त्याने 3 चौकार मारले. 18 बॉलमध्ये 46 धावा करून टीम डेविड आऊट झाला. सारा तेंडुलकरला हे पाहावंलं नाही. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद गायब झाला आणि ती जोरात स्टेडियममध्ये ओरडली. 

सारा तेंडुलकरचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. याचे फोटोही समोर आले. आधी टीम डेविड चांगलं खेळत होता. त्यामुळे सारा आनंदाने स्टेडियममध्ये नाचत होती. अचानक आऊट झाल्याने तिचा हिरमोड झाला.

हैदराबादचा रोमांचक विजय झाला. या विजयाने टीमच्या प्लेऑफच्या आशा वाढल्या आहेत. राहुल त्रिपाठीने 44 बॉलमध्ये 76 धावा केल्या. त्याला प्लेअर ऑफ द मॅचने सन्मानित करण्यात आलं.