Rohit Sharma च्या सिक्सवर पत्नी रितीकापेक्षा सारा तेंडुलकरची रिएक्शन व्हायरल!

सतत फ्लॉप खेळींनंतर अखेर सनरायझर्स हैदराबादच्या विरूद्ध रोहित शर्माचा जुना अवतार पहायला मिळाला.

Updated: May 18, 2022, 08:22 AM IST
Rohit Sharma च्या सिक्सवर पत्नी रितीकापेक्षा सारा तेंडुलकरची रिएक्शन व्हायरल! title=

मुंबई : मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माची यंदाच्या आयपीएलमध्ये फार निराशाजनक कामगिरी दिसून आली आहे. मोठी खेळी खेळण्यात यावेळी तो अपयशी ठरताना दिसला. सतत फ्लॉप खेळींनंतर अखेर सनरायझर्स हैदराबादच्या विरूद्ध रोहित शर्माचा जुना अवतार पहायला मिळाला.

हिटमॅन (रोहित शर्मा) SRH विरुद्ध जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला. त्याने झटपट डावाची सुरुवात केली आणि दुसऱ्याच ओव्हरमध्ये त्याने शानदार सिक्स ठोकला. मात्र या सिक्सपेक्षा यावर सारा तेंडुलकरने दिलेल्या रिएक्शनची चर्चा अधिक होतेय. पत्नी रितिका सजदेहच्या रिएक्शनपेक्षा सारा तेंडुलकरची प्रतिक्रिया सध्या व्हायरल होत आहे.

सनरायझर्स हैदराबादचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर दुसरी ओव्हर टाकत होता. यावेळी पाचव्या बॉलवर रोहितने लाँग ऑनवर हवेत मोठा शॉट मारला. यावेळी तो बॉल थेट स्टँडमध्ये पोहोचला. रोहितचा हा अप्रतिम शॉट पाहून स्टेडियममध्ये एकच जल्लोष झाला.

सारा तेंडुलकरची रिएक्शन पाहण्यासाठी क्लिक करा

यावेळी स्टेडियममध्ये रोहितची पत्नी रितिका सजदेह आणि सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर बसल्या होत्या. त्या दोघींनीही या शॉटता पूर्ण आनंद घेतला. या दोघींच्याही रिएक्शनचा व्हिडीयो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र दुसरीकडे रोहित शर्माचं अर्धशतक या सामन्यात चुकलं.

रोहित शर्माने हैदराबादविरोधात 36 बॉल्समध्ये 48 रन्सची उत्तम कामगिरी केली. ज्यामध्ये 2 चौकार आणि 4 सिक्सेसचा समावेश आहे. या सिझनमधील पहिलं अर्धशतक करण्यासाठी रोहित अवघ्या 2 रन्सनी चुकलं.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x