सेक्स टेप व्हायरल केल्याचा गुन्हा; या स्टार फुटबॉलपटूला किती वर्षांची शिक्षा?

सहकारी खेळाडूला ब्लॅकमेल केल्याबद्दल दोषी ठरवून शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Updated: Nov 25, 2021, 11:23 AM IST
सेक्स टेप व्हायरल केल्याचा गुन्हा; या स्टार फुटबॉलपटूला किती वर्षांची शिक्षा? title=

फ्रान्स : फ्रान्सचा स्टार फुटबॉलपटू करीम बेन्झेमा अडचणीत सापडला आहे. सेक्स टेप व्हायरल करण्याची धमकी आणि ब्लॅकमेल केल्याप्रकरणी त्याला एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.या काळात त्याला फुटबॉल टीममधून देखील निलंबित केलं जाणार आहे. यासोबतच व्हर्साय कोर्टाने बेन्झेमाला $84,000 (सुमारे 62 लाख रुपये) चा दंडही ठोठावला आहे.

हे प्रकरण 2015चं आहे. त्यानंतर काही लोक फ्रेंच फुटबॉल संघाचा खेळाडू मॅथ्यू वाल्ब्युएना सेक्स टेप व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करत होते. या आरोपींमध्ये करीम बेन्झेमाचेही नाव समोर आलं आहे. आता त्याला त्याच्याच सहकारी खेळाडूला ब्लॅकमेल केल्याबद्दल दोषी ठरवून शिक्षा सुनावण्यात आली आहे.

शिक्षेचा बेन्झेमाच्या कारकिर्दीवर फारसा परिणाम होणार नाही

या शिक्षेमुळे 33 वर्षीय बेन्झेमाची कारकीर्द संपेल असं वाटत नाही. त्याचा त्याच्यावर फारसा परिणाम होणार नाही. करीम बेन्झेमा स्पॅनिश फुटबॉल क्लब रिअल माद्रिदकडूनही खेळतो. 

त्याच वर्षी त्याने शानदार हॅट्ट्रिक गोल करत आपल्या संघाला चॅम्पियन बनवलं. तो या वर्षी 29 नोव्हेंबर रोजी घोषित होणार्‍या बॅलोन डी'ओर पुरस्कारासाठी प्रमुख दावेदारांपैकी एक आहे. पॅरिसमध्ये या पुरस्काराची घोषणा होणार आहे.

बेन्झेमाचे वकील पुन्हा अपील करणार

फ्रान्सचा हा स्टार फुटबॉलपटू सुरुवातीपासूनच या आरोपांचं खंडन करत असल्याची माहिती आहे. गेल्या महिन्यात आणि निकालाच्या दिवशी या प्रकरणाची सुनावणी झाली तेव्हा बेन्झेमा न्यायालयात उपस्थित नव्हता. त्याच्याशिवाय अन्य चार जणांनाही दोषी ठरवण्यात आलं आहे. हे चारही आरोपी न्यायालयात हजर झाले नाहीत.