U19 T20 World Cup Final, INDW vs ENGW : टीम इंडियाच्या (INDW vs ENGW) मुलींनी रविवारी मोठा इतिहास रचला आहे. अंडर -19 टी-20 वर्ल्डकपमच्या फायनलमध्ये इंग्लंडचा पराभव करत टीम इंडिया विश्वविजेती (Team India win under 19 T20 womens World Cup) बनली आहे. टीम इंडियाच्या फलंदाजींनी 69 रन्सचं आव्हान अवघ्या 14 ओव्हर्समध्ये पार पाडलं. गोलंदाजीनंतर फलंदाजीमध्ये उत्तम कामगिरी करत टीम इंडियाच्या मुलींनी वर्ल्डकपवर कब्जा मिळवला आहे. 7 विकेट्सने भारताच्या मुलींनी इंग्लंडवर विजय मिळवला आहे. मुख्य म्हणजे ही टूर्नामेंट जिंकणारा भारत पहिला संघ ठरला आहे.
टीम इंडियाच्या फलंदाजांकडून त्रिशा आणि सौम्या तिवारीने सर्वाधिक म्हणजे 24 रन्सची खेळी केली. तर कर्णधार शेफाली वर्मा अवघ्या 15 रन्सवर माघारी परतली. वर्ल्डकपमध्ये पहिल्यापासून चांगल्या फॉर्ममध्ये असलेली श्वेता सेहरावत फायनलच्या सामन्यात मात्र साजेसा खेळ करू शकली नाही. मात्र टारगेट अवघ्या 69 रन्सचं असल्याने भारताने 3 विकेट्स गमावत सहजतेने पूर्ण केलं.
टीम इंडियाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजींचा निर्णय घेतला होता. हा निर्णय खूपच फायदेशीर ठरला. अवघ्या 68 रन्समध्ये इंग्लंडच्या मुलींचा ऑलआऊट झाला. इंग्लंडकडून रियान मॅकडोनाल्ड गे हिने सर्वाधिक म्हणजेच 19 रन्सची खेळी केली. तर एलेक्सा स्टोनहाउस आणि सोफिया स्मेल या दोन्हींनी प्रत्येकी 11-11 रन्स केले. याशिवाय कोणत्याही खेळाडू 10 पेक्षा जास्त धावसंख्या गाठता आलेली नाही.
भारताकडून तितास साधू, अर्चना देवी आणि पार्श्वी चोपडा या तिघींनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर मन्नत कश्यप, शेफाली वर्मा आणि सोनम यादव यांना 1-1 विकेट काढण्यात यश आलं. अवघ्या 17.1 ओव्हर्समध्ये इंग्लंडचा संपूर्ण संघ पव्हेलियनमध्ये परतला होता.
सध्याचा महिला अंडर-19 T20 वर्ल्डकप प्रथमच खेळवला गेला. याआधी पुरुष क्रिकेटमध्ये फक्त अंडर-19 वर्ल्डकप होता आणि तोही वनडे फॉर्मेटमध्ये. महिला अंडर-19 वर्ल्डकप पहिल्यांदाच होतोय आणि तोही टी-20 फॉरमॅटमध्ये. आणि या पहिल्याच वर्ल्डकपवर टीम इंडियाच्या मुलींना कब्जा मिळवला आहे.