Shakib Al Hasan ला भर मैदानात राग अनावर; अंपयारशीही केली बाचाबाची!

पाकिस्तान आणि बांगलादेश या सामन्यामध्ये शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) च्या कृत्याची चर्चा होतेय. या सामन्यात शाकिबला राग अनावर झाल्याचं दिसून आलं.

Updated: Nov 6, 2022, 05:31 PM IST
Shakib Al Hasan ला भर मैदानात राग अनावर; अंपयारशीही केली बाचाबाची! title=

T20 world cup 2022 : टी-20 वर्ल्डकपमध्ये  (t20 world cup 2022) आज मोठे उलटफेर पहायला मिळाले. सकाळी झालेल्या दक्षिण आफ्रिकाविरूद्ध नेदरलँड्स या सामन्यामध्ये नेदरलँड्सचा (SAvsNED) विजय झाला. मुख्य म्हणजे या विजयाचा फायदा पाकिस्तानला होऊन पाकिस्तान (Pakistan) टीमला सेमीफायनलचं तिकीट मिळालंय. दरम्यान आज झालेल्या पाकिस्तान आणि बांगलादेश या सामन्यामध्ये शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) च्या कृत्याची चर्चा होतेय. या सामन्यात शाकिबला राग अनावर झाल्याचं दिसून आलं.

नॉकआउटच्या सामन्यांमध्ये जागा मिळवण्यासाठी प्रत्येक टीम प्रयत्न करत होती. आजच्या सामन्यात पाकिस्तानकडूनही हेच प्रयत्न सुरु होते. दरम्यान बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन (Shakib Al Hasan)ला भर सामन्यात राग आला आणि त्याने रागाच्या भरात टोपी जमिनीवर फेकली.

पाकिस्तानच्या फलंदाजी करत असताना 12व्या ओव्हरमध्ये ही घटना घडलीये. इबादत हुसेनने ओव्हरच्या चौथ्या बॉलला फुलर साईडला पिच केलं. यावेळी फलंदाज मोहम्मद नवाजचा शॉट चुकला. बॉल पॅडवर आदळताच तो फिल्डरकडे गेला. फिल्डर नसुम अहमदने पाकिस्तानच्या खेळाडूंना रन्स घेताना पाहताच त्याने रन आऊट करण्यासाठी जोरात स्पंपकडे जोरात फेकला.

यावेळी नवाज क्रिझपासून फार दूर होता, जर डायरेक्ट हीट लागला असता तर त्याला माघारी परतावं लागलं असतं. पण नसुमचा निशाणा चुकला. याठिकाणी बॅकअप फिल्डर नसल्याने बॉल बाऊंड्रीच्या पार गेला. याच गोष्टीचा राग शाकिब अल हसनला अनावर झाला आणि आउट ऑफ कंट्रोल होऊन त्याने स्वतःची टोपी जोरात जमिनीवर आदळली. 

यादरम्यान शाकिब ऑनफिल्ड अंपायरशी वाद देखील घालताना दिसला. शाकिब अल हसनला रिव्ह्यू घ्यायचा होता पण, कदाचित रिव्ह्यू घेण्याची वेळ देखील संपली होती. त्यामुळे अंपायरने अमान्य घोषित केला. शाकिब अल हसन आणि ऑनफिल्ड अंपायर यांच्यात बराच वेळ शाब्दिक बाचाबाची होताना दिसली.