मुंबई : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या अडचणी काही संपण्याची चिन्हे दिसत नाहीयेत. हसीन जहाँने मार्चमध्ये शमीविरोधात मारहाण, बलात्कार, हत्येचा प्रयत्न, घरगुती हिंसाचार आणि मॅच फिक्सिंसारखे आरोप लावले होते. दरम्यान, शमीने हे सर्व आरोप फेटाळून लावले. आता कोलकाता पोलिसांनी शमीच्या नावाने समन्स जारी केलेत. शमीवा कोलकाता पोलिसांसमोर बुधवारी १८ एप्रिलला दोन वाजण्याच्या आत हजर राहायचे आहे. पोलीस बलात्कार आणि घरगुती हिंसाचार प्रकरणात शमीची चौकशी करणार आहेत.
हसीन जहाँने शमीवर अनेक गंभीर आरोप लावलेत. जहाँने शमीचा भाऊ हासिबवर बलात्काराचा आरोप केला होता. शमीसोबत त्याच्या भावालाही समन्स जारी कऱण्यात आलेत. शमीच्या उपस्थितीत त्याच्या भावाने आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप हसीन जहाँने केला होता. मीडियासमोर दिलेल्या माहितीत तिने ही बाब सांगितली होती. शमीचा भाऊ बलात्कार करत होता मात्र शमीने कोणतीही मदत केली नाही.
सध्या मोहम्मद शमी कोलकातामध्येच आहे. १६ एप्रिलला दिल्ली आणि कोलकाता यांच्यातील सामन्यादरम्यान तो उपस्थित होता. या सामन्यात दिल्लीचा पराभव झाला होता.
बलात्काराच्या आरोपावर स्पष्टीकरण देताना शमी म्हणाला, हसीनने केलेले सर्व आरोप खोटे आहे. यात कोणतेही सत्य नाहीये.
जहाँने केलेल्या बलात्काराच्या आरोपावर शमीचा भाऊ म्हणाला, ज्या भावावर हसीन जहाँने ७ तारखेला बलात्काराचा आरोप केला होता त्या भावाच्या घरी ती ८ तारखेला जाते आणि भाभीसोबत लंच करते. त्यांना मिलादसाठी बोलावते. जर गँगरेप झाला तर ती पोलिसांकडे का गेली नाही?
दरम्यान हसीनने याआधी शमीकडे भत्ता देण्याची मागणी केलीये. हसीन जहाँच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, हसीनने मोहम्मद शमी, त्याची आई, मोठा भाऊ आणि वहिनीविरोधात घरगुती हिंसाचाराची केस दाखल केलीये. तसेच हसीन जहाँने दर महिन्याला १० लाख रुपये भत्त्याची मागणी केलीये. हसीनने ७ लाख रुपये कुटुंबाचा मेंटेनन्स आणि ३ लाख रुपये मुलीसाठी.
हसीन जहाँच्या तक्रारीनंतर कोलकाता पोलिसांनी शमीविरोधात भारतीय दंड विधानानुासर कलम 498A/323/307/376/ 505/ 328/34 अंतर्गत केस दाखल केलीये.