शेन वॉटसन आणि त्याची पत्नी ली फरलॉन्गचं असं जुळलं

 शेन वॉटसन आणि त्याची पत्नी ली फरलॉन्ग यांच्या प्रेमाचीही अशीच रोमांचक कहाणी आहे.

Updated: Apr 21, 2018, 08:42 AM IST

मुंबई : क्रिकेटर्स आणि त्यांच्या प्रेमकहाण्यांचा विषय नेहमीच चर्चेत असतो.  शेन वॉटसन आणि त्याची पत्नी ली फरलॉन्ग यांच्या प्रेमाचीही अशीच रोमांचक कहाणी आहे. या दोघांची भेट एका कार्यक्रमादरम्यान झाली.  २००६पासून ते दोघ एकमेकांना डेट करत होते. साधारण ४ वर्ष डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. वॉटसनचा संपूर्ण परिवार मॅच बघायला स्टेडियममध्ये हजर असतो. ली ही ‘एस एफ सेलेब्रिटी मैनेजमेंट कंपनी' ची मालकीण आहे. तिची कंपनी ऑस्ट्रेलियन सेलिब्रेटींचे करियर आणि प्रोफाईल मॅनेज करते.