'गब्बर'चं रेकॉर्ड! कोणत्याच भारतीयाला करता आली नाही ही कामगिरी

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये शिखर धवननं शानदार शतक झळकावलं.

Updated: Feb 10, 2018, 09:54 PM IST
'गब्बर'चं रेकॉर्ड! कोणत्याच भारतीयाला करता आली नाही ही कामगिरी title=

जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये शिखर धवननं शानदार शतक झळकावलं. वनडे क्रिकेटमधलं धवनचे हे १३वं शतक आहे. शिखर धवन १०५ बॉल्समध्ये १०९ रन्स करून आऊट झाला. धवनच्या या खेळीमध्ये ११ फोर आणि २ सिक्सचा समावेश होता.

या शतकाबरोबरच धवननं अनोखं रेकॉर्ड त्याच्या नावावर केलं आहे. स्वत:च्या १००व्या वनडेमध्ये शतक झळकावणारा धवन हा पहिला भारतीय खेळाडू बनला आहे. १०० वनडे खेळणारा धवन ३४वा खेळाडू आहे.

आपल्या १००व्या वनडेमध्ये सगळ्यात पहिले वेस्ट इंडिजच्या गॉर्डन ग्रीनिज यांनी शतक झळकवलं. यानंतर क्रिस केन्स, मोहम्मद युसूफ, कुमार संगकारा, क्रिस गेल, रामनरेश सरवन, मार्क ट्रेस्कोथिक आणि डेव्हिड वॉर्नर यांनीही १००व्या वनडेमध्ये शतक केलं होतं.

विराटचंही रेकॉर्ड

पहिल्या वनडेमध्ये विराटनं शतक झळकावलं. तर दुसऱ्या वनडेमध्ये विराटनं अर्धशतकीय खेळी केली. तिसऱ्या वनडेमध्ये विराटनं १६० रन्सची नाबाद खेळी केली. चौथ्या वनडेमध्ये ७५ रन्स करून विराट आऊट झाला. पण विराट कोहलीनं आणखी एक रेकॉर्ड स्वत:च्या नावावर केलं आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये अर्धशतक पूर्ण केल्यानंतर या दौऱ्यात विराटच्या ६४७ रन्स पूर्ण झाल्या. विराट आता परदेश दौऱ्यामध्ये सर्वाधिक रन्स बनवणारा भारतीय कॅप्टन बनला आहे. याआधी हे रेकॉर्ड राहुल द्रविडच्या नावावर होतं.

द्रविडनं २००६साली वेस्ट इंडिज दौऱ्यावर ६४५ रन्स केले होते. तर विराट कोहलीनं २०१७ साली श्रीलंका दौऱ्यावर एकूण ५७३ रन्स केल्या होत्या. या यादीमध्ये मोहम्मद अझहरुद्दीन चौथ्या क्रमांकावर आहे. अझहरनं १९९०च्या इंग्लंड दौऱ्यावर ५४४ रन्स केल्या होत्या.