कोलंबो : श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टच्या पहिल्या दिवशी भारतानं चांगली सुरुवात केली आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये कमबॅक केलेल्या शिखर धवननं शानदार शतक केलं पण त्याचं द्विशतक केवळ दहा रन्सनं हुकलं. धवननं फक्त १६८ बॉल्समध्ये १९० रन्सची खेळी केली. धवनच्या या खेळीमध्ये ३१ फोरचा समावेश होता.
धवन बरोबरच ओपनिंगला आलेल्या अभिनव मुकुंदला मात्र फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. मुकुंद १२ रन्सवर प्रदीपची शिकार झाला. प्रदीपनं मुकुंदबरोबरच धवन आणि कोहलीचीही विकेट घेतली. विराट कोहली फक्त तीन रन्स करून माघारी परतला.