Shikhar Dhawan : 'एक बाप म्हणून मी...' जोरावरच्या बर्थडे पोस्टवर शिखरने केला खुलासा, म्हणाला 'माझा लेक मला...'

Shikhar Dhawan On Zoravar birthday Post : लेकाच्या बर्थडेला शिखरने भावनिक पोस्ट लिहिली होती. त्यावर आता शिखरने मोठा खुलासा केला आहे.

सौरभ तळेकर | Updated: Jan 29, 2024, 09:18 PM IST
Shikhar Dhawan : 'एक बाप म्हणून मी...' जोरावरच्या बर्थडे पोस्टवर शिखरने केला खुलासा, म्हणाला 'माझा लेक मला...' title=
Shikhar Dhawan On Zoravar birthday Post

Shikhar Dhawan emotional : टीम इंडियाचा स्टार खेळाडू शिखर धवन (Shikhar Dhawan) त्याच्या वैयक्तिक जीवनामुळे नेहमी चर्चेत असतो. आयशा मुखर्जीपासून (Ayesha Mukherjee) घटस्फोटानंतर शिखरच्या आयुष्यात अनेक संकटं आली. आयशाने धवनला त्याच्या एकुलत्या एक मुलापासून वर्षानुवर्षे वेगळे राहण्यास भाग पाडून मानसिक त्रास दिल्याचा आरोप शिखरवर करण्यात आला होता. त्यानंतर दिल्लीतील एका कौटुंबिक न्यायालयाने विभक्त राहण्याचा निर्णय दिला होता. अशातच लेकाच्या (Shikhar Dhawan Son Zoravar) बर्थडेला शिखरने भावनिक पोस्ट लिहिली होती. त्यावर आता शिखरने मोठा खुलासा केला आहे.

काय म्हणाला शिखर धवन?

मला वेदना होत नव्हती. मी फक्त माझे विचार मांडण्याचा प्रयत्न करत होतो आता या सर्व गोष्टींना पाच महिने झाले, त्याच्याशी बोलून मी फक्त भावना व्यक्त करत होतो. मी एक भावनिक माणूस आहे आणि मी फक्त त्याला प्रेम पाठवण्याचा प्रयत्न करत होतो, असं शिखरने म्हटलं आहे. जर मी त्याच्याबद्दल विचार करत असताना दुःखी झालो तर नकारात्मक ऊर्जा त्याला मिळाली असती, असं शिखर धवनने ह्युमन्स ऑफ बॉम्बेच्या एका मुलाखतीत म्हटलं आहे.

माझी पोस्ट इतकी व्हायरल होईल हे मला कधीच वाटलंच नाही. मी ते फक्त माझ्या भावना मनापासून लिहिल्या होत्या. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात माझा मुलगा कदाचित माझी पोस्ट वाचेल या आशेने मी ते लिहिलं आहे, असा खुलासा शिखर धवनने केला आहे. तो कुठंही असला तरी मला वाटतं की त्याने आनंदी रहावं. एक दिवस तो येईल अन् मला दिसेल, असं म्हणताना शिखर भावूक झाल्याचं दिसून आलं.

मी एक वडील आहे आणि मी माझे कर्तव्य बजावण्याचा प्रयत्न करतोय. मी त्याला दररोज मॅसेज करतो. पण ते मॅसेज त्याला मिळतात का नाही? माहित नाही. मी त्याच्यासोबत जगायला शिकलो, त्यामुळे मला त्याची खूप आठवण येते. माझा मुलगा माझ्या जवळ असावा अशी माझी इच्छा आहे. मला त्याला मिठी मारायची आहे. मला त्याला फक्त दोनदा भेटण्याची परवानगी आहे. ती ही दोन ते तीन तासांसाठी, असं शिखर धवन म्हणतो.