शोएब अख्तरने 18 वर्षांनी लहान तरुणीशी केलेलं लग्न; आता वयाच्या 48 व्या वर्षी तिसऱ्यांदा झाला बाप

Shoaib Akhtar 18 year younger Wife Rubab Khan: शोएब अख्तरने 10 वर्षांपूर्वी खैबर पख्तूनख्वा प्रांतातील हरिपूरमध्ये एका खासगी सोहळ्यामध्ये शोएब आणि रुबाबा खान यांचा निकाह केला होता.

स्वप्निल घंगाळे | Updated: Mar 2, 2024, 01:09 PM IST
शोएब अख्तरने 18 वर्षांनी लहान तरुणीशी केलेलं लग्न; आता वयाच्या 48 व्या वर्षी तिसऱ्यांदा झाला बाप title=
शोएबनेच दिली गुड न्यूज

Shoaib Akhtar 18 year younger Wife Rubab Khan: पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर तिसऱ्यांदा वडील झाला आहे. त्याची पत्नी रुबाब खानने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. शुक्रवारी 1 मार्च रोजी 48 वर्षीय शोएबच्या घरी चिमुकलीचं आगमन झालं. या दोघांना यापूर्वी 2 मुलं आहेत. मोहम्मद मिकाइल अली आणि मोहम्मद मुजद्दद अली असं शोएबच्या दोन्ही मुलांची नावं आहे. यापैकी मोहम्मद मिकाइल अलीचं जान्म 2016 चा असून मोहम्मद मुजद्दद अलीचा जन्म 2019 चा आहे. शोएब अख्तरने आपल्या इन्स्ताग्राम अकाऊंटवरुन तिसऱ्यांदा वडील झाल्याची गोड बातमी शेअर केली आहे. शोएबने सर्वांचे आभार मानले असून घरी आलेल्या चिमुकलीला आशीर्वाद द्यावेत आणि तिच्यासाठी प्रार्थना करावी अशी इच्छा व्यक्त केली आहे.

काय म्हणाला शोएब?

शोएब अख्तर सध्या भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये एक उत्तम समालोचक म्हणून ओखळला जातो. क्रिकेट विश्वातील सर्वात वेगवान गोलंदाज अशी आपली ओळख निर्माण करणाऱ्या शोएबने इन्स्टाग्रामवरुन कन्यारत्नप्राप्तीची माहिती दिली आहे. 'मिकाइल आणि मुजद्ददला आता एक लहान बहीणही आहे. अल्लाहने आम्हाला मुलीच्या रुपयात आशीर्वाद दिला आहे,' अशा शब्दांमध्ये शोएबने मुलीच्या आगमनाची बातमी दिली आहे. "आम्ही नूरह अली अख्तरचं स्वागत करतो. तिचा जन्म 19 शाबान, 1445 हिजरी म्हणजेच 1 मार्च 2024 रोजी जुम्मेच्या नमाजाच्या दिवशी झाला. मी तुम्हा सर्वांचा प्रार्थनेसाठी आभारी आहे," असं शोएबने इन्स्टाग्रामवर लेकीबरोबरचा फोटो शेअर करत म्हटलं आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shoaib Akhtar (@imshoaibakhtar)

2014 साली लग्न

2014 मध्ये खैबर पख्तूनख्वा प्रांतातील हरिपूरमध्ये एका खासगी सोहळ्यामध्ये शोएब आणि रुबाबा खान यांचा निकाह झाला होता. त्यावेळेस शोएब 38 वर्षांचा तर रुबाब 20 वर्षांची होती. शोएबचं लग्न त्याच्या आई-वडिलांनीच ठरवलं होतं. त्यांच्या पहिल्या मुलाचा जन्म नोव्हेंबर 2016 मध्ये झाला होता. 3 वर्षांनी जुलै 2019 मध्ये शोएबला मुजद्दद नावाच्या मुलाचा जन्म झाला होता.

शोएबचा शेवटचा सामना कधी झाला?

शोएब अख्तरने 1997 साली पाकिस्तानसाठी पदार्पण केलं होतं. 2011 साली वर्ल्ड कपदरम्यान आपला शेवटचा सामना खेळला होता. अख्तरने 46 कसोटी सामने, 163 एकदिवसीय सामने आणि 15 टी-20 सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत 178 विकेट्स घेतल्या आहेत. तर एकदिवसीय सामन्यांमध्ये 274 विकेट्स घेतल्यात. टी-20 मध्ये त्याच्या नावावर 19 विकेट्स आहेत.