पाकिस्तानविरुद्धच्या विक्रमानंतर शुभमनचे आई-वडिल भावूक

अंडर १९ वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये भारतानं पाकिस्तानचा दारूण पराभव केला. 

Updated: Jan 30, 2018, 06:08 PM IST
पाकिस्तानविरुद्धच्या विक्रमानंतर शुभमनचे आई-वडिल भावूक  title=

मुंबई : अंडर १९ वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये भारतानं पाकिस्तानचा दारूण पराभव केला. शुभमन गिल हा भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. शुभमननं १०२ रन्सची नाबाद खेळी केली. या शतकाबरोबरच शुभमन गिलनं अनेक रेकॉर्ड स्वत:च्या नावावर केले आहेत.

शुभमननं केली ही रेकॉर्ड

या वर्ल्ड कपच्या सगळ्या मॅचमध्ये शुभमननं ५० पेक्षा अधिक रन्स केल्या आहेत. तसेच अंडर १९ वर्ल्डकपच्या इतिहासात शुभमनने असा रेकॉर्ड केलाय जो आतापर्यंत कोणीच केलेला नाही. शुभमन गिल अंडर १९ वर्ल्डकपच्या इतिहास एकमेव फलंदाज आहे ज्याने सलग सहा सामन्यांमध्ये ५०हून अधिक धावा केल्यात. याआधी हा रेकॉर्ड मेहदी हसन मिराजच्या नावावर होता.

अंडर १९ वर्ल्डकपमध्ये भारताकडून जलद शतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत शुभमन तिसऱ्या स्थानावर आहे. हा रेकॉर्ड आतापर्यंत भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या नावावर आहे.

शुभमनचे आई-वडिल भावूक

या ऐतिहासिक कामगिरीनंतर शुभमनचे आई-वडिल भावूक झाले. मागच्या २ वर्षांपासून शुभमन वर्ल्ड कपची तयारी करत होता. शुभमनच्या मेहनतीमुळे हे शक्य झाल्याचं शुभमनचे वडिल म्हणाले. तर शुभमनची कामगिरी पाहून मी भारावून गेल्याचं त्याची आई म्हणाली.

शुभमनच्या शतकानंतर भारत विजयी होईल, असा विश्वास वाटत होता अशी प्रतिक्रिया शुभमनच्या आईनं दिली. शुभमन आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणार आहे. शुभमनला केकेआरनं २ कोटी रुपयांना विकत घेतलं. शुभमनवर विश्वास दाखवल्याबद्दल शुभमनच्या आईनं केकेआरचे आभार मानले आहेत. 

Tags: