कोरिया सुपर सीरिजसाठी सिंधू सज्ज

वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू मंगळवारपासून सुर होत असलेल्या कोरिया सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेसाठी सज्ज झालीये.

Updated: Sep 11, 2017, 09:32 PM IST
कोरिया सुपर सीरिजसाठी सिंधू सज्ज title=

सेऊल : वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू मंगळवारपासून सुर होत असलेल्या कोरिया सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेसाठी सज्ज झालीये.

या स्पर्धेत भारताची फुलराणी सायना नेहवाल आणि किदम्बी श्रीकांत खेळणार नसल्याने सिंधूच्या कामगिरीकडे चाहत्यांचे लक्ष असेल. जपान ओपनच्या तयारीसाठी सायना आणि श्रीकांत या स्पर्धेत खेळणार नाहीत.

या स्पर्धेत महिला एकेरीत सिंधूचा पहिला सामना हाँगकाँगच्या च्युंग अॅनगॉनशी होणार आहे. तर इंडोनेशिया ओपनध्ये चाँग वेई, चेन लाँगसारख्या मातब्बर खेळाडूंना नमवणाऱ्या एचएस प्रणॉयची लढत हाँगकाँगच्या लाँग अँगसशी होणार आहे. सय्यद मोदी ग्राँ प्रि विजेता समीर वर्मा थायलंडच्या तेनाँगसाक सेनसोमबून्सुकशी भिडणार आहे.