'नॅशनल क्रश' स्मृती मंधानाची प्यार वाली लव्ह स्टोरी, Live कॉन्सर्टमध्ये प्रसिद्ध गायकाने दिला होकार

Palash Muchhal Smirit Mandhana Relationship: भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज आणि नॅशनल क्रश स्मृती मंधाना प्रसिद्ध गायकला डेट करत असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होता. आता यावर शिक्कामोर्तब झालं आहे. लाईव्ह कन्सर्टमध्ये या गायकाने प्रेमाची कबुली दिली आहे. 

राजीव कासले | Updated: Aug 2, 2023, 03:36 PM IST
'नॅशनल क्रश'  स्मृती मंधानाची प्यार वाली लव्ह स्टोरी, Live कॉन्सर्टमध्ये प्रसिद्ध गायकाने दिला होकार title=

Smriti Mandhana Love Story : भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना (Smriti Mandhana) आक्रमक फलंदाज म्हणून ओळखली जाते. पण त्याचबरोबर तिच्या सौंदर्याबाबतही नेहमीच चर्चा होत असते. आता स्मृती मंधानाबाबत आणखी एक चर्चा सुरु झाली आहे. स्मृती मंधाना प्रसिद्ध गायक आणि म्यूझिक कम्पोझर पलाश मुछाल (Palash Mucchal) याला डेट करत असल्याचं बोललं जात आहे. दोघांना एकत्र स्पॉटही करण्यात आलं आहे. पण आपल्या रिलेशनशिपबद्दल या दोघांनीही कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. पण आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होतोय. ज्यात दोघांच्या रिलेशनशिपवर शिक्कामोर्तब झालंय.

स्मृती आणि पलाश यांचा जो व्हिडिओ व्हायरल होतोय, तो smritipalash18 या हँडलवरुन पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पलाश मुछाला याच्या एका लाईव्ह कॉन्सर्टमधला आहे. या व्हिडिओत पलाशनने व्यासपीठाविरुन स्मृतीसाठी आपल्या प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे. व्हायरल व्हिडिओत पलाशने स्मृतीचं प्रपोजल मंजूर करत  I love you too smriti असं म्हणताना दिसत आहे. 

व्हायरल व्हिडिओत म्यूझिक कम्पोझर पलाशने स्मृती आपली प्रेयसी असल्याचं म्हटलं आहे तसंच त्याने तिच्यासाठी एक गाणंही गायलं आहे. या व्हिडिओत पलाशबरोब त्याची बहिण पलक मुछालाही उभी असल्याचं दिसतंय. या व्हिडिओला एक कॅप्शनही देण्यात आला आहे. यात लिहिलंय, मला विश्वास बसत नाहीए की पलाशने स्मृतीचं नाव घेतलं, चार वर्षांच्या रिलेशनशिपवर आता शिक्कामोर्तब झालं आहे, पलाशने आय लव्ह यू टू स्मृती असं म्हटलं, म्हणजे स्मृतीने त्याला आधी विचारलं असणार, पलाशने ज्याप्रकारे प्रेश्रकांसमोर आपलं प्रेम व्यक्त केलं आहे, ते खूप आवडलं असं या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं आहे. 

स्मृती मंधानाची ओळख
18 जुलै 1996 मध्ये मुंबीत स्मृतीचा जन्म झाला. स्मृतीच्या आईचं नाव स्मित, वडिलांचं नाव श्रीनिवास आणि भावाचं नवा श्रावण असं आहे. स्मृती दोन वर्षांची असताना तिचं कुटुंब सांगलीतल्या माधवनगर इथं शिफ्ट झालं. त्यानंतर सांगलीतच स्मृती लहानाची मोठी झाली. स्मृतीला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती. स्मृती अवघ्या 11 वर्षांची असताना तिची अंडर 19 संघात निवड झाली. स्मृतीने 10 एप्रिल 2013 मध्ये बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. तर ऑगस्ट 2014 मध्ये वर्म्सले पार्क इथं इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलं.