Women's T20 WC 2023 : मराठमोळ्या Smriti Mandhana ने रचला इतिहास, एलिसा हिलीला टाकलं मागे...

Smriti Mandhana : नॅशनल क्रश असलेल्या स्मृती मानधनाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ICC महिला T20 विश्वचषक 2023 मध्ये स्मृती मानधना सर्वाधिक धावा करणारी पहिली फलंदाज ठरली आहे. या प्रकरणात त्याने एलिसा हिलीला मागे सोडले.

Updated: Feb 21, 2023, 09:32 AM IST
Women's T20 WC 2023  : मराठमोळ्या Smriti Mandhana ने रचला इतिहास, एलिसा हिलीला टाकलं मागे... title=
Smriti Mandhan created history Highest run score in Women's T20 WC 2023 and Alyssa Healy cricket news in marath

Smriti Mandhana Most Runs Women T20 World Cup 2023 :  मराठमोळ्या स्मृती मानधनाच्या (smriti mandhana) चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या आपल्या स्मृतीने ICC महिला T20 विश्वचषक 2023 मध्ये सर्वाधिक धावा करुन इतिहास रचला आहे. दक्षिण आफ्रिकेत चालू असलेल्या महिला T20 World Cup 2023 मध्ये सोमवारी 20 फेब्रुवारीला आयर्लंडवर  (Ireland women) विजय मिळवला. डकवर्थ पद्धतीच्या आधारे भारतीय महिला संघाने (Team India)आयर्लंडचा फज्जा उडवला.  (Smriti Mandhan created history Highest run score in Women's T20 WC 2023 and Alyssa Healy cricket news in marath)

@mandhana_smriti's scintillating innings of 87 off 56 balls helped #TeamIndia book their place in the #WomensT20WorldCup semi-finals! Congratulations to @BCCIWomen on an excellent performance! #INDWvsIREW pic.twitter.com/vW12NXCXrX

या विजयामुळे भारतीय महिला संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या मॅच स्मृतीचं शतक हुकलं मात्र तिच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाला विजय मिळवता आला. मात्र स्मृतीच्या खेळाबद्दल बोलायचं झालं तर T20 World Cup 2023 मध्ये तिने ऑस्ट्रेलियाच्या एलिया हिलीला मागे टाकत सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली आहे.

 

स्मृतीने सर्वाधिक धावा 

दक्षिण आफ्रिकेत चालू असलेल्या महिला टी20 विश्वचषक 2023 मध्ये सर्वाधिक धावा करून करिष्मा केला आहे. वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत तीन सामने खेळल्या गेले आहेत. त्यात स्मृतीने 149 धावा केल्या आहेत. याआधी एलिसाने तीन सामन्यांत 146 धावा केल्या होत्या. यामुळे स्मृतीने एलिसाला मागे टाकलं आहे. स्मृतीने सोमवारच्या सामन्यात चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. या खेळीत तिने 9 चौकार आणि 3 षटकार ठोकले. 

सेमी फायनलमध्ये धडक 

सोमवारी झालेल्या आयर्लंड समोर 156 धावांचे आव्हान देण्यात आले होते. या सामन्यात पावसामुळे व्यतय आल्यामुळे डकवर्थ लूईस नियमानुसार हा सामना भारतीय महिला संघाच्या खिशात गेला. आयर्लंडचा 5 धावांनी पराभव करत टीम इंडियाने सेमी फायनलमध्ये धडक मारली.