मुंबई : वेस्टइंडिज आणि श्रीलंकेमध्ये सुरु असलेला दूसरा टेस्ट सामना वादात सापडला आहे. अंपायरने बॉल बदलण्याचा निर्णय घेतल्याने श्रीलंकेने मैदानात उतरण्यास नकार दिला आहे. अंपायरने बॉल बदलल्याने श्रीलंकेची टीम नाराज झाली. वेस्टइंडीज विरुद्ध सुरु असलेल्या दुसऱ्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी श्रीलंकेने खेळण्याच नकार दिला आहे. अंपायर अलीम दार आणि इयान गुड यांनी बॉल बदलण्याच्या सूचना केल्या. बॉलची स्थिती चांगली नसल्याने निर्णय घेण्यात आला होता.
वेस्टइंडिजने श्रीलंकेविरुद्ध 253 रन केले होते. पहिल्या इनिंगमध्य़े 2 विकेट गमवत श्रीलंका 118 रनवर खेळत होती. श्रीलंकेच्या टीमने अंपायरच्या या निर्णयाचा विरोध केला. अंपायर, मॅच रेफरी जवागल श्रीनाथ आणि श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चंदीमल यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर श्रीलंकेवर 5 रनचा दंड लावण्यात आला आणि बॉल देखील बदलण्यात आला. शेवटी श्रीलंकेच्या टीमने अखेर मैदानावर उतरण्याचा निर्णय घेतला.