सूर्यकुमार एकटा नाही, आणखी 3-4 खेळाडू प्रतिक्षेत - रवी शास्त्री

सूर्यकुमारला आणखी वाट पाहावी लागणार...

Updated: Nov 3, 2020, 04:28 PM IST
सूर्यकुमार एकटा नाही, आणखी 3-4 खेळाडू प्रतिक्षेत - रवी शास्त्री title=

दुबई : इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या सत्रात सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे. घरगुती क्रिकेटमध्येही तो चांगल्या धावा करत आहे. यावर्षी ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी त्याची निवड होईल असं अनेकांना वाटत होतं. पण तसं झालं नाही. निवड समितीने सूर्यकुमारच्या नावावर चर्चा केली नाही.

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सूर्यकुमारच्या फलंदाजीचे कौतुक केले आहे आणि संयमाने काम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी अनेकदा सोशल मीडियावर ट्विट करून सूर्यकुमारच्या चांगल्या फलंदाजीचे कौतुक केले. एका इंग्रजी वेबसाईटशी बोलताना प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी म्हटलं की, सूर्यकुमारसारखे आणखी बरेच खेळाडू टीम इंडियामध्ये जागा मिळण्याची वाट पाहत आहेत.

सूर्यकुमारला अजून थांबावे लागेल, असे भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकांनी स्पष्ट केलंय. ते म्हणाले, "प्रत्येक तरुण खेळाडूला संयम राखण्यास मी सांगत आहे. सूर्यकुमारसारखे तीन ते चार खेळाडू आहेत पण जेव्हा तुमच्याकडे एखादा कौशल्य आणि अनुभव भरलेली टीम असेल तेव्हा ते खूप अवघड होते."

'मला आठवतंय की मी माझ्या कारकीर्दीत जेव्हा मी खेळत होतो. तेव्हा 1 ते 6 पर्यंत खेळाडूंची जागा पक्की असायची. मीडल ऑर्डरमध्ये जागा मिळवणं कठीण असायचं. असे खेळाडू देखील असतात ते घरगुती क्रिकेटमध्ये शतकं ठोकल्यानंतर सतत निवड समितीचं दार ठोठावत असतात.'