मुंबई : टी 20 वर्ल्ड कपमधील (ICC T20 World Cup 2021) दुसरी सेमी फायनल मॅच ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान (Australia vs Pakistan) यांच्यात खेळवण्यात आली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तावर विजय मिळवला. मॅथ्यू वेडने फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. वेड फटकेबाजी करत असताना पाकिस्तानच्या हसन अलीने (Hasan Ali) निर्णायक क्षणी कॅच सोडला. हा कॅच सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला. त्यामुळे पाकिस्तानला पराभवाला सामोरे जावे लागल्याचं म्हंटल जात आहे. त्यामुळे हसनवर सडकून टीका केली जात आहे. दरम्यान हसनच्या पाठीशी आता त्याचा सासरेबुवा धावून आले आहेत. (t 20 world cup semi final australia vs pakistan Shahid Afridi criticism for dropping Matthew Wade catch Hasan Ali father in law slammed Afridi)
हसनच्या पाठीशी सासरे
हसन अलीचे सासरे लियाकत अली यांनी टीकाकारांना चोख प्रत्युतर दिलं आहे. लियाकत अली यांनी हसनला ट्रोल करणाऱ्यांना मूर्ख असल्याचं म्हंटलं आहे. तसेच लियाकत यांनी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीचा भावी सासरा शाहिद आफ्रिदीवर भडकले आहेत.
शाहिद आफ्रिदीवर भडकले लियाकत अली
"मला ऐकायला आलं की शाहिद आफ्रिदी माझ्या जावयाला ट्रोल करतोय. त्याच्या जावयानेही एका ओव्हरमध्ये 22 धावा लुटवल्या. शाहिद आपल्या होणाऱ्या जावयाला ट्रोल का नाही करत. माझ्याच जावयासोबत असं करतोय. शाहिदने त्याच्या जावयाच्या कामगिरीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले असते तर तो निष्पक्ष असल्याचं मानलं असतं. मात्र शाहिद तसा नाही", अशा शब्दात लियाकत अली यांनी शाहिद आफ्रिदीवर संताप व्यक्त केला आहे. लियाकत अली एका टीव्ही शोमध्ये सहभागी झाले होते. यावेळेस ते बोलत होते. दरम्यान लियाकत अली यांच्या संतापानंतर शाहिद आफ्रिदी प्रत्युत्तर देणार का, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिलं आहे.
हसन भारताचा जावई
हसन अली भारताचा जावई असल्यानेही त्याला जाणीवपूर्वक ट्रोल केलं जात आहे. हसन अलीची बायको शामिया आरजू ही भारतीय आहे. हे दोघे 20 ऑगस्ट 2019 मध्ये विवाहबद्ध झाले होते. शामिया आरजू ही मूळची हरयाणातील नूंह जिल्ह्यातील मेवातची रहिवाशी आहे.
|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.