T20 WC: 12 वर्षांच्या मुलीने डिझाईन केलेल्या जर्सीची होतेय चर्चा

हे किट एका 12 वर्षांच्या मुलीने तयार केलं आहे.

Updated: Oct 20, 2021, 07:31 AM IST
T20 WC: 12 वर्षांच्या मुलीने डिझाईन केलेल्या जर्सीची होतेय चर्चा

स्कॉटलंड : टी -20 वर्ल्डकपमधील पहिल्याच सामन्यात बांगलादेशचा पराभव करून स्कॉटलंडने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यावेळी वर्ल्डकपमध्ये स्कॉटलंडने घातलेल्या किटचं देखील खूप कौतुक होत आहे. विशेष गोष्ट म्हणजे हे किट एका 12 वर्षांच्या मुलीने तयार केलं आहे. त्यामुळे सध्या स्कॉटलंडच्या क्रिेकेट टीमसोबत ही चिमुकली मुलगी देखील चर्चेत आहे.

12 वर्षीय Rebecca Downieने ही जर्सी स्कॉटलंडहून डिझाईन केली आहे. जेव्हा या किटची जगभरात प्रशंसा झाली, तेव्हा स्कॉटलंड क्रिकेटच्या वतीने ट्विट करून Rebecca Downieचे आभार मानण्यात आले. Rebecca Downieने देखील टीव्हीवर स्कॉटलंडचा पहिला सामना पाहिला.

दरम्यान, वर्ल्डकप सुरू होण्यापूर्वी स्कॉटलंड क्रिकेटने एक स्पर्धा आयोजित केली होती. ज्यामध्ये सुमारे 200 शाळकरी मुलांकडून विविध जर्सी डिझाईन्स करून घेण्यात आल्या होत्या. या नोंदींमधून Rebecca Downieने डिझाईन केलेली जर्सी निवडली गेली.

जांभळ्या रंगाने चमकणाऱ्या स्कॉटलंडची किट ट्विटर युजर्सना देखील आवडलं आहे. प्रत्येकजण या जर्सीला वर्ल्डकपमधील सर्वोत्तम किट असल्याचं म्हणत आहेत.

स्कॉटलंडचा संघ जेव्हा बांगलादेशविरुद्ध टी -20 वर्ल्डकप खेळण्यासाठी मैदानात उतरला, तेव्हा 12 वर्षीय Rebecca Downieसाठी हा एक खास दिवस होता. वर्ल्डकप येण्यापूर्वी स्कॉटलंड संघाने Rebecca Downieही भेट घेतली.