T20 World Cup-2022 : टी 20 वर्ल्डकपमध्ये बुधवारी बांगलादेशवर (Bangladesh) दणदणीत विजय मिळवला आणि टीम इंडियाने सेमी फायनलचे (semi finals) तिकीट जवळपास निश्चित केलं. आतापर्यंत T20 World Cup मध्ये टीम इंडियाची कामगिरी चांगली राहिली आहे. चार पैकी 3 सामन्यांमध्ये रोहित शर्माच्या टीमने कमाल केली आहे. एकमेव दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) टीम इंडियाचा (Team India) बल्ला चालला नाही. टीम इंडियासाठी प्रत्येक खेळाडूची कामगिरी महत्त्वाची आहे. पण काही खेळाडूंना संधी देऊनही त्यांची जादू चालताना दिसतं नाही आहे. कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्या साठी आता हा खेळाडू डोकेदुखी ठरतं चालला आहे.
Axar Patel in T20 World Cup-2022 : कर्णधार रोहित शर्मा अष्टपैलू अक्षर पटेलला (Axar Patel) सतत संधी देत आहे. त्याला सध्याच्या स्पर्धेत केवळ एका सामन्यातून वगळण्यात आलं होतं आणि दीपक हुडाला संधी मिळाली पण बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात त्याने पुनरागमन केलं. मात्र, अक्षरला अद्याप टी-20 विश्वचषकात आपली छाप पाडता आलेली नाही.
अक्षरला सध्याच्या T20 विश्वचषकात आतापर्यंत फक्त 2 विकेट्स मिळाल्या आहेत. त्याने पाकिस्तानविरुद्ध 21 धावा केल्या आणि त्याला एकही विकेट मिळाली नाही. त्यानंतर नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात 18 धावांत 2 बळी घेतले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात त्याला वगळण्यात आलं होतं. त्यानंतर अॅडलेडमध्ये बांगलादेशविरुद्धही त्याचं खातं उघडलं नाही आणि त्याला एकही विकेट मिळवता आली नाही. अक्षरने आतापर्यंत 35 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून त्यात त्याने 33 विकेट घेतल्या आहेत.शिवाय त्याने एकूण 171 धावा केल्या आहेत. त्याने कसोटीत 39 आणि एकदिवसीय सामन्यात 53 बळी घेतले आहेत.
त्यांच्या शेवटच्या सामन्यात भारतीय संघाने डकवर्थ लुईस नियमानुसार बांगलादेशचा 5 धावांनी पराभव केला. बुधवारी अॅडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने 6 बाद 184 धावा केल्या, त्यानंतर पावसामुळे बांगलादेशला 16 षटकांत 151 धावांचे सुधारित लक्ष्य मिळाले. बांगलादेशचा संघ 6 बाद 145 धावा करू शकला. 44 चेंडूत 64 धावा करणाऱ्या विराट कोहलीला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.