टी20 वर्ल्ड कपमध्येही Nitish Kumar चा बोलबाला, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अमेरिकेला तारलं

Who is Nitish Kumar : टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये सर्वात मोठा उलटफेर पाहायला मिळाला. आयसीसी क्रमवारीत 18 व्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकेने बलाढ्या पाकिस्तानवर मात करत इतिहास रचला. सुपर ओव्हरमध्ये अमेरिकेने पाकिस्तानला धुळ चारली.

राजीव कासले | Updated: Jun 7, 2024, 04:32 PM IST
टी20 वर्ल्ड कपमध्येही Nitish Kumar चा बोलबाला, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अमेरिकेला तारलं title=

Who is Nitish Kumar: भारतीय राजकारणात सध्या जनता दल युनायटेडच्या नीतीश कुमार यांची जोरदार चर्चा आहे. नीतीश कुमार यांच्या पाठिंब्यावर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करणार आहेत. याच दरम्यान आणखी एका नीतीश कुमारची  (Nititsh Kumar) चर्चा रंगली आहे. हा नीतीश कुमार आहे क्रिकेटमधला. टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) नीतीश कुमारने अमेरिकेला तारलं. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात (USA vs Pakistan) नीतीश कुमारने शेवटच्या चेंडूवर चौकार मारत अमेरिकेला सुपर ओव्हरची संधी दिली. सुपर ओव्हरमध्ये अमेरिकेने पाकिस्तानवर मात करत इतिहास रचला. अमेरिकेचा वेगवान गोलंदाज सौरभ नेत्रावळकरबरोबरच नीतीश कुमारही अमेरिकेच्या विजयाचा हिरो ठरला.

चौकार लगावत रंगतदार केला सामना
नीतीश कुमार पाकिस्तानविरुद्ध 14 चेंडूत 14 धावा करत नाबाद राहिला. पहिली फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानने अमेरिकेसमोर 159 धावांचं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानचा पाठलाग करताना अमेरिकेला शेवटच्या चेंडूवर 5 धावांची गरज होती. समोर हॅरिस रौफ सारखा अनुभवी आणि दिग्गज गोलंदाज होता. अमेरिका हा सामना हरणार असंच क्रिकेट चाहत्यांना वाटत होतं. पण खेळपट्टीवर स्ट्राईकवर असलेल्या नीतीश कुमारच्या मनात वेगळच सुरु होतं. हॅरिस रौफने यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला. यावर नीतीश कुमारने लॉफ्टेड स्ट्रोक मारत चौकार ठोकला. याबरोबर सामना टाय झाला. अमेरिकेनेही 159 धावा केल्या होत्या. नीतीश कुमारच्या या खेळीने अमेरिकेने सुपर ओव्हर गाठली होती. सुपर ओव्हरमध्ये अमेरिकेने इतिहास रचला.

कोण आहे नीतीश कुमार?
30 वर्षांचा नीतीश अमेरिका क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज आहे. उजव्या हाताने फलंदाजी करणारा नीतीश हा मूळ भारतीय निवासी आहे. त्याचा जन्म कॅनडाच्या ओंटारियोमध्ये 21  मे 1994 मध्ये झाला. कॅनाडाच्या फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा नीतीश हा सर्वात लहान वयातला क्रिकेटपटू ठरला होता. 2009 मध्ये नीतीश कॅनडासाठी आयसीसी आंतरराष्टीय सामन्यात केनियाविरुद्ध खेळला. 

सर्वात तरुण खेळाडूचा विक्रम
नीतीशने फेब्रुवारी 2010 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा सर्वात लहान क्रिकेटपटू होण्याचाही मान पटकावलाय. नीतीशने अवघ्या 15 वर्ष 273 दिवसांचा असताना एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. पाकिस्तानचा हसन रजा हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा सर्वात लहान खेळाडू आहे. या यादीत नीतीश कुमार पाचव्या क्रमांकावर आहे. नीतीश कुमार सलग 3 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात अर्धशतक झळकवणारा क्रिकेट जगतातील नववा फलंदाज आहे. नीतीशच्या नावावर दोन देशांकडून आंतरराष्ट्रायी क्रिकेट खेळण्याचाही रेकॉर्ड आहे. 

मित्रांकडून तेंडुलकर नाव
नीतीश कुमार कॅनाडामधून क्रिकेट खेळण्यासाठी अमेरिकेत आला. अमेरिकेत त्याला क्रिकेट खेळण्याची चांगली संधी मिळीला. नीतीश कुमारने 16 एकदिवसीय सामन्यात 238 तर 24 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 532 धावा केल्यात. त्याच्या नावावर धावा कमी असल्या तरी बेस्ट फिनिशर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. नीतीशचे मित्र त्याला प्रेमाने अमेरिकेचा तेंडुलकर म्हणतात.