तनिष्क गवतेनं मोडला प्रणव धनावडेचा रेकॉर्ड

तनिष्क गवतेनं प्रणव धनवडेचा रेकॉर्ड मोडला आहे. 

Updated: Jan 30, 2018, 09:30 PM IST
तनिष्क गवतेनं मोडला प्रणव धनावडेचा रेकॉर्ड  title=

नवी मुंबई : नवी मुंबईच्या कोपरखैरणेच्या यशवंतराव चव्हाण इंग्रजी शाळेच्या तनिष्क गवतेनं नाबाद १०४५ धावांची खेळी करत प्रणव धनावडेचा विक्रम मोडीत काढला. तनिष्कनं आपल्या या खेळीमध्ये चौकार आणि षटकारांचा रतीब लावला.

तनिष्कनं आपल्या या १०४५ धावांच्या खेळीमध्ये ५१५ चेंडूंमध्ये १४९ चौकार आणि ६७ षटकार ठोकत प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांच्या नाकी नऊ आणले. धनावडे पेक्षा अधिक धावा झळकावल्यानं सध्या त्याच्या नावाची चर्चा सुरु आहे. प्रणव धनावडेनं दोन वर्षापूर्वी १००९ नाबाद धावांची खेळी केली होती. मात्र स्पर्धेची मान्यता विश्‍वविक्रमाला अडसर ठरु शकते.