तिसऱ्या वनडेआधी टीम इंडियाची मजामस्ती, हार्दिक पंड्या बनला अँकर

भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यानच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना आज होतोय. पहिला सामना पावसाता धुऊन निघाल्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवला. त्यामुळे मालिकेतील पहिला विजय साकारण्यासाठी वेस्ट इंडिज संघ उत्सुक आहे. 

Updated: Jun 30, 2017, 05:32 PM IST
तिसऱ्या वनडेआधी टीम इंडियाची मजामस्ती, हार्दिक पंड्या बनला अँकर  title=

अँटिग्वा : भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यानच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना आज होतोय. पहिला सामना पावसाता धुऊन निघाल्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवला. त्यामुळे मालिकेतील पहिला विजय साकारण्यासाठी वेस्ट इंडिज संघ उत्सुक आहे. 

वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यापूर्वी भारतीय संघाने चांगलीच मजामस्ती केली. क्रिकेटर्सनी व्हॉलीबॉलची मजा घेतली. जेट स्काय रायडिंग तसेच समुद्रातही मजा मस्ती केली. 

टीम इंडियाच्या फेसबुक पेजवर टीम इंडिया मजा मस्ती करत असल्याचा व्हिडीओ टाकण्यात आलाय. या व्हिडीओत हार्दिक पंड्या अँकरिंग करतोय.