आयपीएल लिलावात या 2 खेळाडूंवर सगळ्यांची असणार नजर

इंडियन प्रीमियर लीगच्या नव्या सीजनसाठी जगभरातील खेळाडूंवर आज बोली लागणार आहे. 

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Jan 27, 2018, 10:48 AM IST
आयपीएल लिलावात या 2 खेळाडूंवर सगळ्यांची असणार नजर

बंगळुरू : इंडियन प्रीमियर लीगच्या नव्या सीजनसाठी जगभरातील खेळाडूंवर आज बोली लागणार आहे. 

सर्व जगातील क्रिकेट प्रेमींचं शनिवारी आणि रविवारी होणाऱ्या खेळाडूंच्या लिलावावर असेल. या लिलावात एकूण 578 खेळाडू आहेत. ज्यांच्यावर बोली लागणार आहे. ज्यामध्ये 244 कॅप्ड खेळाडू आहेत. त्यापैकी 62 भारतीय आहेत. 332 अनकॅप्ड खेळाडूंमध्ये 34 विदेशी खेळाडू आहेत.

कोणावर असणार नजर

बेन स्टोक्स आणि रविचंद्रन अश्विनवर मोठी बोली लागण्याची शक्यता आहे. भारत आणि जगभरातील 16 टॉप क्रिकेटर्सवर सगळ्यांची नजर असणार आहे. ज्यांची बेस प्राइस 2 कोटी रुपये असेल. यामध्ये स्टोक्स, अश्विन, शिखर धवन, मिचेल स्टार्क, क्रिस गेल आणि ड्वेन ब्रावो यांचा समावेश आहे.

मागच्या सीजनमध्ये 14 कोटी 50 लाखाला इंग्लंडचा टॉप ऑलराउंडर स्टोक्स सर्वात महागडा खेळाडू ठरला होता.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x